हैदराबाद : ज्येष्ठ महिन्यातील एकादशीला अपरा एकादशीचे व्रत केले जाते. या वर्षी अपरा एकादशी 15 मे रोजी येत आहे. अपरा एकादशीला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपवास करुन व्रत करतात. अपरा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यात येते. त्यामुळे जाणून घेऊया काय आहे अपरा एकादशीचे महत्व आणि पूजा विधी याबाबतची सविस्तर माहिती.
काय आहे अपरा एकादशीचे महत्व : अपरा एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. भाविक भक्त अपरा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करुन दिवसभर उपास करतात. अपरा एकादशीला उपवास केल्याने सगळ्या पापांचा नाश होत असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे. अपरा एकादशीला व्रत केल्याने जीवनातील सगळी संकटे दूर होऊन मोक्षाची प्राप्ती होत असल्याची भाविकांची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात भगवान विष्णूंची सेवा करुन दिवसभर उपवास आणि व्रत होतात.
कधी आहे अपरा एकादशीचा शुभ मुहुर्त : अपरा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सगळ्या पापापासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे अपरा एकादशीला भाविक मोठ्या भक्तीभावाने भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यामुळे अपरा एकादशीचा शुभ मुहुर्त नेमका कधी आहे, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत. अपरा एकादशी सोमवार 15 मेच्या सकाळी 02 वाजून 46 मिनीटांनी सुरू होणार आहे. तर अपरा एकादशी 16 मे मंगळवारी रात्री 01 वाजून 03 मिनीटांनी समाप्त होणार आहे. अपरा एकादशीचा पारण मुहुर्त 16 मे रोजी सकाळी 06 वाजून 41 मिनीटांनी सुरू होणार असून त्याच दिवशी सकाळी 08 वाजून 13 मिनीटांनी समाप्त होणार आहे.
कसा करावा अपरा एकादशीचा पूजा विधी : अपरा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे अपरा एकादशीला दशमी तिथीच्या एक दिवस आधी भगवान विष्णूची पूजा सुरू करण्यात येते. दशमी तिथीच्या सूर्यास्तानंतर भोजन घेणे निषिद्ध मानण्यात येते. अपरा एकाधसीला अभ्यंगस्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. त्यानंतर पूर्व दिशेला जमिनीवर पिवळ्या वस्त्रावर भगवान विष्णूच्या मूर्ती किवा फोटोची स्थापना करावी. फोटोसमोर दिवा लावून कलश स्थापित करण्यात यावा. स्थापना झाल्यानंतर भगवान विष्णूला फळे, फुले, सुपारी, नारळ, लवंगा आदी अर्पण करुन आसनस्थ होऊन ध्यान करावे. त्यानंतर भगवान विष्णूंची मनोभावे धारणा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावण्यात यावा. अपरा एकादशीला 'विष्णु सहस्रनाम' पाठ केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक अपरा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करतात.
हेही वाचा -