हैदराबाद: प्राणी संग्रहालय प्राणी व पक्ष्यांचा सांभाळ करण्यासाठी बनविलेले स्थान आहे. प्राण्यांची आवड अनेकांना असते. सध्या ती आवड वाढू लागली आहे. त्यामुळे आपण बऱ्याचदा सुट्टीच्या दिवसांमध्ये देशभरातील प्राणी संग्रहालयाला भेट देतो. देशभरातील प्राणी संग्रहालयांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या असूनही आपण त्या सूचना पाळत नाही. त्यामुळे प्राणी संग्रहालयाचे नुकसान होते. तसेच प्राण्यांनाही त्रास होतो. जेव्हा आपण प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा खाली दिलेल्या टिप्स फाॅलो करा. (Animal lovers, animal museum, take care of museum, take care of zoo)
प्राणी संग्रहालयात गेल्यावर या गोष्टी चुकूनही करू नका: 1. कुठल्याच प्राण्याला कोणीही कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये. 2. प्राणी संग्रहालयात कोणत्याही खाद्य पदार्थ घेऊन जाण्याची मनाही आहे. तिथे काहीही खाण्याची अनुमति नाही. तसेच तेथिल प्राण्यांना कुठल्याही प्रकारचे खाद्य विनापरवानगीशिवाय देऊ नये. 3. कोणत्याही प्राण्याला कोणी हात लावणार नाही. तसेच प्राणी बघताना डिस्टन्स मेंटेन करणे महत्त्वाचे आहे. 4. प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, हत्ती, जिराफ , गेंडा, माकड इत्यादि प्राणी असतात. त्यांचा छेडछाड करू नये. तसेच तिथल्या प्राण्यांवर दगडफेक किंवा मातीफेक करू नये. 5. प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येत असलेल्या प्राणी व पक्ष्यांचा सांभाळ करताना त्यांचा कुठल्याही अडचणी पासून बचाव करण्यासाठी केंद्रीय प्राणी उद्यान प्राधिकरणाने देशभरातील प्राणी संग्रहालयांना काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या असतात त्याचे काटेकोरपणे पालन करावे. (take care of animals)
6. प्राण्यांच्या देखभाली साठी डॉक्टर नेहमी प्राणी संग्रहालायत हजर असतात. प्राण्यांमध्ये काही भिन्न बदल नजरेस आल्यास त्यांना लगेच कळवावे. 7. प्राण्यांची वाहतूक आणि प्रजनन काळात अधिक काळजी घेण्याच्या सूचना फाॅलो कराव्यात. 8. घरटे आणि त्यांचे पिंजरे याबाबतही विस्तृत स्वरूपात माहिती दिलेली असते, ती व्यवस्थित वाचावी. 9. परवानगीशिवाय फोटो काढू नये. 10. माणसात ‘प्राणिजन्य’ रोगाची लागण रोगग्रस्त प्राण्यांच्या संपर्कात आल्याने, प्राणिजन्य दूषित पदार्थांच्या सेवनाने किंवा हवेमार्फत होते. त्यामुळे स्वत:हाची देखील काळजी घ्या. (Don't miss out on these things when visiting a zoo)