ETV Bharat / sukhibhava

Adolf Hitler : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्मदिन मानला जातो जगभरात काळा दिन, काय आहे त्याचा रक्तरंजित इतिहास? - हुकूमशहा

जगात 20 एप्रिल हा काळा दिवस म्हणून गणला जातो. या दिवशी कुप्रसिद्ध हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. महायुद्धातील पराभवास ज्यू नागरिक कारणीभूत असल्याचा आरोप करत हिटलरने असंख्य नागरिकांच्या हत्या घडवल्या.

Adolf Hitler Birth Anniversary 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 20, 2023, 1:26 PM IST

हैदराबाद : दुसऱ्या महायुद्धाला अ‍ॅडॉल्फ हिटलर जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतो. अ‍ॅडॉल्फ हिटलर या हुकूमशहाने जगभरातील ज्यू लोकांची हत्या केल्याने हिटलरवर जगभरातून टीका करण्यात येते. अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकूमशहा होता. जर्मनीच्या पराभवाला ज्यू नागरिक जबाबदार असल्याने हिटलरने ज्यू नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या. त्यामुळे हिटलर जगभरात कुप्रसिद्ध झाला. अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 ला झाला. त्यामुळे 20 एप्रिल हा जगाच्या इतिहासात काळा दिवस असल्याचे मानले जाते.

कोण होता अ‍ॅडॉल्फ हिटलर : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 ला अ‍ॅलॉइस व क्लारा या दाम्पत्याच्या पोटी ऑस्ट्रियातील ब्रानो आम इन येथे झाला. अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील अ‍ॅलॉइस हे सैन्यात अधिकारी होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने आपल्या अगोदरच्या संघर्षाच्या काळात व्हिएन्नाच्या रोडवर चित्रे काढून आपला चरितार्थ चालवला, रस्त्यावरचा बर्फ साफ केला तर नागरिकांच्या घराला रंग देऊनही आपली उपजिविका चालवली. अ‍ॅडॉल्फ हिटलरचे प्राथमिक शिक्षण लिंज येथे झाले. मात्र हिटलर 17 व्या वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याने व्हियन्नाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर हिटलरने सैन्यात भरती होऊन अनेक लढायात भाग घेतला.

नाझी पक्षाची केली स्थापना : हिटलरने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे वचन नागरिकांना दिले. त्यामुळे हिटलरच्या भाषणांवर विश्वास ठेऊन अनेक नागरिक त्याकडे आकर्षित झाले. पहिल्या महायुद्धातील पराभवाला ज्यू नागरिक असल्याने हिटलरने याचा बदला घेण्याचे ठरवले. हिटलरने नाझी पक्षाची 1918 मध्ये स्थापना केली. 1923 मध्ये हिटलरने जर्मन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिटलरला कारागृहात टाकण्यात आले. कारागृहातच हिटलरने माईन कॉम्फ अर्थात माझा संघर्ष हे पुस्तक लिहिले. त्यानंतर 1930 ते 1932 मध्ये नाझी सदस्यांच्या दलांची संख्या वाढली. त्यानंतर 1933 मध्ये हिटलर चान्सलर झाल्यानंतर त्याने जर्मनीची संसद बरखास्त करुन टाकली. साम्यवादी दलाला बेकायदेशीर घोषित केले. त्यानंतर जोजेफ गोबेल्सला आपला प्रचारमंत्री नेमले. त्यांची गोबेल्स थेअरी जगप्रसिद्ध आहे. 1934 मध्ये हिटलरने सगळी सत्ता आपल्या हातात घेऊन त्याला सर्वोच्च न्यायाधिश घोषित केले. त्यानंतर हिटलरने असंख्य ज्यू नागरिकांची कत्तल केली. त्यामुळे अ‍ॅडॉल्फ हिटलर जगभरात कुप्रसिद्ध झाला.

हेही वाचा - Fruit Vegetables Lower Miscarriage Risk : गरोदरपणात फलाहारामुळे गर्भपाताचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.