ETV Bharat / sukhibhava

मलबेरी सेवनाचे वजन कमी करण्यासह हे आहेत फायदे, संशोधनातून झाले सिद्ध

तुतीचे फळ (Mulberry) खायला जेवढे स्वादिष्ट असते तेवढाच त्याचा शरीराला देखील फायदा होतो. याच्या सेवनाने पचन तंत्राचे विकार आणि लघवीचे आजार इत्यादी आजारांमध्ये आराम मिळते. त्याचबरोबर, तुतीच्या फळाचे सेवन केल्याने वजनही कमी होते, असे नुकतेच झालेल्या एका संशोधनाच्या निकालातून समोर आले आहे.

mulberry and its benefits
तुती फळ फायदे हृदय रोग
author img

By

Published : Jul 29, 2021, 6:46 PM IST

Updated : Jul 31, 2021, 2:49 PM IST

तुतीचे गोड फळ खायला जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यासाठी पण चांगले आहे. इतकेच नव्हे तर, तुतीच्या फळाची तूलना लोकं औषधी वनस्पतींशीही करतात. मात्र, लोकांना या फळाच्या गुणांबाबत जास्त माहिती नाही.

तुतीचे फळ हे एक दुर्मिळ फळ आहे. ते आशियातील समशीतोष्ण क्षेत्रात (temperate zones) उगवले जाते. त्यात डायटरी फाईबर चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे ते पोटासाठी चांगले असते. इटलीच्या एफ.डी रिटिस इन्स्टिट्यूट आणि कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ सेक्रेड हार्टद्वारे केल्या गेलेल्या एका संशोधनात तुतीचे फळ खाल्ल्याने वजन कमी होत असल्याचे लक्षात आले आहे.

तुतीच्या फळाचे गुणधर्म

तज्ज्ञ सांगतात की, तुतीचे फळ हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे हृदयसंबंधी समस्या टाळता येऊ शकतात. तेच तुतीचे पाढरे फळ हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तुतीच्या फळात अँटीऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन व रेसव्हेराट्रोल (Resveratrol) सारखी फायटोन्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते ट्यूमर पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करतात आणि कॅन्सरपासून बचाव करतात.

तुतीचे फळ रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित करतो. त्यात असलेले अँटीऑक्सिडेंट आणि पोटॅशियम रक्त वाहिन्यांचे कार्य सुलभ करते आणि रक्तदाब कमी करण्यात मदत करते. तुतीचे फळ लाल रक्तपेशींच्या निर्मितीत मदत करते, कारण त्यात भरपूर प्रमाणात लोह (iron) असतो. त्यामुळे, ते अॅनिमिक लोकांसाठी फायद्याचे असते.

भौगोलिक परिस्थितीमुळे तुतीच्या फळाचे गुणधर्म प्रभावित होऊ शकतात

यांग एक्स, यांग एल आणि झेंगएचद्वारे पबमेडमध्ये प्रकाशित झालेल्या आभ्यासानुसार, तुतीच्या फळातील फॅटी अॅसिडची मात्रा, त्याचे अन्य गुणधर्म आणि त्याची रचना ही वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार भिन्न असू शकतात. संशोधनादरम्यान वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीतील तुतीच्या फळांचा आभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, चीनी तुतीच्या फळांमध्ये 87.5 टक्के असंपृक्त (unsaturated) फॅटी अॅसिडसह एकूण 7.55 टक्के लिपिड होते.

चीनी तुतीच्या फळामध्ये सर्वाधिक फॅटी अॅसिड सामग्री होती ती म्हणजे लिनोलिआक अॅसिडची (linoleic acid) (सी 18:2) 79.4%. त्यानंतर पाल्मिटिक अॅसिड (palmitic acid) (सी 16:2) 8.6% आणि ओलिआक अॅसिड (oleic acid) (सी 18:1) 7.5 %. त्याचबरोबर, फळामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (α-linolenic acid) 0.6 % टक्के होते. तेच तुर्कीच्या तुतीच्या फळामध्ये सर्वाधिक फॅटी अॅसिड सामग्री लिनोलिआक अॅसिडचे (linoleic acid) प्रमाण (सी 18:2) 57%, त्यानंतर पाल्मिटिक अॅसिड (palmitic acid) (सी 16:0) 22.4% इतके दिसून आले. मात्र, त्यात लिनोलेनिक अॅसिड (सी 18:3) असल्याची माहिती मिळाली नाही.

आरोग्यासाठी लाभदायक

गाजराप्रमाणे तुतीचे फळ देखील डोळ्यांसाठी चांगले असते. तुतीच्या फळात झिआझांतीन (zeaxanthin) असते, जे डोळ्यांच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते. तुतीच्या फळातील कॅरोटीनोईड (Carotenoid) हे मोतियाबिंद आणि मस्क्यूलर डीजनरेशन (macular degeneration) रोखण्यास मदत करते. तुतीचे फळ रोगप्रतिकारक प्रणाली आणि मेंदू कार्याची क्षमता सुधारण्यास मदत करते. या फळात विटामिन-सी, विटामिन-के आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असेत, जे हाडांचे ऱ्हास टाळण्यास मदत करतात आणि हाडांचे विकार जसे, ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis), संधिवात (arthritis) यांस प्रतिबंध घालतात. तसेच, तुतीचा पांढरा फळ हा तुरट मात्र जिवाणुनाशक मानला जातो. त्यात यकृत (liver) मजबूत करण्याची क्षमता असते.

अँटी-एजिंगला मदत करते

तुतीच्या फळात रेस्वेराट्रॉल (Resveratrol) असतो जो त्वचेचे आरोग्य सुधारतो. त्याचबरोबर, ते अँटी-एजिंग गुणधर्माणे देखील समृद्ध असतात. फळातील बीटा-कॅरोटीन सारखे अँटीऑक्सिडेंट्स फ्री-रॅडिकल्सना निष्क्रीय (neutralize) करतात, सुरकुत्य कमी करतात, त्वचेवर डाग होण्यास रोखतात. नियमितपणे तुतीचे फळ खाल्ल्यास केस चमकदार आणि निरोगी राहतात.

तुतीचा वापर कोणत्याही प्रकारे केला जाऊ शकतो

सायन्सडायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या आभ्यासानुसार, तुतीच्या झाडाचा वापर आयुर्वेदिक वनस्पती म्हणून मानवाचे जीवन सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केला जातो. त्यासाठी तुतीच्या झाडाचे पत्ते, देठ (stem) आणि मुळांमध्ये आढळणाऱ्या जैविकरित्या सक्रिय फार्माकोकिनेटिक संयुगांचा (pharmacokinetic compounds) वापर केला जातो. त्याचबरोबर, औषध, अन्न, कॉस्मेटिक्स आणि आरोग्य सेवांमध्ये तुतीचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने उद्योजकांचे लक्ष वेधत आहेत. सेरीकल्चर, औषध, कॉस्मेटिक, अन्न आणि पेय उद्योगांसह पर्यावरण सुरक्षा दृष्टिकोनातून तुतीचा वापर होत आहे. त्यामुळे, त्यास शाश्वत विकासासाठी सर्वात योग्य वनस्पती म्हणता येईल.

Last Updated : Jul 31, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.