ETV Bharat / sukhibhava

ब्रेन डेड तरुणीमुळे ५८ वर्षीय रुग्णाला मिळाले नवजीवन - राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस

केजीएमयूच्या (KGMU) डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत एकताचे यकृत (Brain dead girl Ekta Pandey liver donated) रुग्णावर प्रत्यारोपित केले. ही कठीण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केजीएमयूच्या 40 हून अधिक कर्मचाऱ्यांनी दिवाळीची सुट्टीही घेतली नाही.

brain dead
ब्रेन डेड
author img

By

Published : Oct 27, 2022, 5:19 PM IST

लखनऊ : ब्रेन डेड घोषित करण्यात आलेल्या तरुणीच्या यकृताचे प्रत्यारोपण करून डॉक्टरांनी ५८ वर्षीय रुग्णाला नवजीवन दिले आहे. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये दाखल झालेल्या 18 वर्षीय एकता पांडेला श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे दिवाळीला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून एकताच्या आई-वडिलांनी एकताचे अवयव दान करण्यास संमती दिली. केजीएमयूच्या डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत एकताचे यकृत अशोक गोयल या रुग्णावर प्रत्यारोपित केले.

तीव्र वेदना होत होत्या: केजीएमयूच्या ४० हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही कठीण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिवाळीची सुट्टीही घेतली नाही. प्रक्रिया संपल्यानंतर डॉक्टरांनी आनंद साजरा केला. आंबेडकर नगर येथे राहणारी एकता हिला काही दिवसांपासून छातीत तीव्र वेदना होत होत्या. तिला प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून तिला राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RMLIMS) येथे पाठविण्यात आले. मात्र तिथे व्हेंटिलेटर नसल्याने नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. आर्थिक अडचणींमुळे 22 ऑक्टोबर रोजी तेथून केजीएमयूमध्ये हलवले.

अवयव दान करण्याचा निर्णय: केजीएमयूच्या डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही एकताला वाचवता आले नाही आणि तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. यानंतर एकताच्या कुटुंबीयांनी एकताचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. केजीएमयूमध्ये हे 18 वे यकृत प्रत्यारोपण होते आणि आठवडाभरातील दुसरे यकृत प्रत्यारोपण होते. एकताच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिला जगायचे आहे, पण देवाला काही वेगळेच मंजूर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.