ETV Bharat / sukhibhava

काय आहे इंटरमिटंट फास्टिंग? याने वजन घटण्यात मदत होते का? वाचा.. - weight loss by intermittent fasting

सामान्य पद्धतीने खाण्यापूर्वी ठराविक कालावधीसाठी पूर्ण किंवा अंशतः उपवास करणे म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग (मधूनमधून उपवास) करणे हे होय. काही आभ्यासानुसार, या पद्धतीने खालल्याने वजन घटते, आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. पारंपारिक कॅलरी-नियंत्रित आहारांपेक्षा इंटरमिटंट फास्टींगचे पालन करणे सोपे आहे, असे त्याचे पालन करणाऱ्या समर्थकांचा दावा आहे.

what is intermittent fasting
इंटरमिटंट फास्टिंग
author img

By

Published : May 15, 2022, 3:40 PM IST

एखाद्याच्या सोयीनुसार मधूनमधून उपवास ( Intermittent fasting ) अनेक प्रकारे करता येतो. मधूनमधून उपवास करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव अनोखा असतो आणि वेगवेगळ्या शैली वेगवेगळ्या लोकांना शोभतील. अधूनमधून उपवास करण्याचा सराव करण्यासाठी पुढील सात भिन्न मार्ग आहेत :

हेही वाचा - स्मार्टफोनच्या अती वापराने तरुणांचे मानसिक आरोग्य होऊ शकते बाधित

1. दिवसाचे 12 तास उपवास - आहाराची मार्गदर्शक तत्त्वे सरळ आहेत. दररोज, एखाद्या व्यक्तीने 12 तास उपवास करण्याचा काळ निवडावा व त्याचे पालन करावे.
काही संशोधकांच्या मते, 10 ते 16 तास उपवास केल्याने शरीरातील चरबीचे संचय ऊर्जेत बदलू शकते, रक्तप्रवाहात केटोन्स सोडल्या जाते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास प्रोत्साहन मिळते.

2. 16 तास उपवास - 16:8 पद्धती, ज्याला लिएनगेन्स (Leangains) आहार म्हणूनही ओळखले जाते, त्यात दिवसाचे 16 तास उपवास करणे आणि 8 तास खाणे समाविष्ट आहे. यात पुरुष 16:8 आहारानुसार दररोज 16 तास उपवास करतो, तर महिला 14 तास उपवास करते. 12 तासांचा उपवास करून कुठलाही फायदा न मिळालेल्या व्यक्तीला या प्रकारचे अधूनमधून उपवास करणे फायदेशीर ठरू शकते.

3. आठवड्यातून २ दिवस उपवास - जे लोक 5:2 आहाराचे पालन करतात ते साधारणपणे 5 दिवस खातात आणि नंतर इतर दोन दिवस कॅलरी कमी करतात. या दोन उपवासाच्या दिवसांत पुरुष साधारणपणे 600 कॅलरीज आणि स्त्रिया 500 कॅलरीचे सेवन करतात.

4. अल्टर्नेट डे फास्टिंग - यात अनेक भिन्नता आहेत. ज्यामध्ये प्रत्येक इतर दिवशी उपवास समाविष्ट असतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की, अल्टर्नेट डे फास्टिंगसाठी उपवासाच्या दिवशी घन पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे. तर इतरांचा असा विश्वास आहे की, 500 कॅलरीजचे सेवन केल्या जाऊ शकते. खायच्या दिवशी, बरेच लोक त्यांना पाहिजे तितके खाणे पसंत करतात. अल्टर्नेट डे फास्टिंग हे अधूनमधून उपवासाचे (Intermittent fasting) तीव्र स्वरूप आहे.

5. साप्ताहिक 24 तास उपवास - दर आठवड्याला एक किंवा दोन दिवस उपवास करणे, ज्याला Eat-Stop-Eat आहार असेही म्हणतात, यात एका वेळी 24 तास अन्नाशिवाय राहण्याचा समावेश आहे. अनेक लोक नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्यावेळी उपवास करतात. या आहार योजनेतील लोक उपवासाच्या काळात पाणी, चहा आणि इतर कॅलरीमुक्त पेय पिऊ शकतात. लोकांनी उपवास नसलेल्या दिवशी त्यांच्या सामान्य खाण्याच्या सवयी पुन्हा सुरू कराव्यात.

6. जेवण वगळणे - अधूनमधून उपवास करण्याच्या या अनुकूल पद्धतीचा नवशिक्यांना फायदा होऊ शकतो. यात अधूनमधून जेवण वगळणे आवश्यक आहे. लोक त्यांची भूक पातळी किंवा वेळेच्या मर्यादेनुसार जेवण वगळू शकतात. तथापि, प्रत्येक जेवणात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

7. योद्धा आहार ( The Warrior Diet ) - वॉरियर डाएट ही अधूनमधून उपवासाची उच्च-तीव्रतेची आवृत्ती आहे. 20 तास उपवास करणे, कच्ची फळे आणि भाज्यांचे काही भाग खाणे आणि नंतर रात्री एक मोठे जेवण करणे हे सर्व वॉरियर डाएटचे भाग आहेत. ज्यांनी इतर प्रकारचे अधूनमधून उपवास करण्याचे प्रयोग केले आहेत त्यांच्यासाठी या प्रकारचा उपवास सर्वोत्तम असू शकतो.

अशा आहाराचे काही आरोग्य फायदे असू शकतात, परंतु एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की, अनावश्यक, दीर्घकाळ उपवास केल्याने मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाच्या कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो आणि शरीराच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली शरीरातील चरबी कमी होते. तसेच, त्यांच्या क्षीणतेचा प्रामुख्याने त्वचा आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

(With agency inputs)

हेही वाचा - 5 amazing home remedies for Tanning : शरीराचे टॅनिंग घालवण्यासाठी 5 टिप्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.