ETV Bharat / sukhibhava

'या' कारणांमुळे करतात स्त्रिया नातेसंबंधात फसवणूक

पती-पत्नीचे किंवा प्रियकर-प्रेयसीचे नाते अतिशय नाजूक असते. त्यात विश्वासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या विश्वासाला जर तडा गेला तर नातेसंबंध तुटतात. काही वेळा महिलाही आपल्या जोडीदाराची फसवणूक करत असतात. त्यामागे त्यांची स्वत:ची अशी कारणे असतात.

author img

By

Published : Dec 7, 2020, 3:25 PM IST

cheating
फसवणूक

हैदरबाद - जेव्हा एखाद्याची त्याच्या जोडीदाराकडून फसवणूक झाल्याची गोष्ट आपल्या कानावर पडते, तेव्हा समाज म्हणून, त्या जोडीदाराला 'जज' करण्याची किंवा त्याविषयी मत बनविण्याची आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. आपल्यासाठी फसवणूक हे एक अनैतिक कृत्य असते आणि एखादा वाईट मनुष्यच अशी कृती करतो अशी आपली भावना असते. परंतु, बहुतांश वेळेला या व्यक्ती एकट्या पडलेल्या असतात असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? खरं तर, जेव्हा एखादी स्त्री अशी कृती करते त्यावेळेला तिच्या या कृत्याला किंवा नात्याबाहेर प्रेम शोधण्यासाठी उद्युक्त करण्यामागे असंख्य भावनिक कारणे असतात. या असंख्य करणामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एक चांगली जोडीदार म्हणून ती करत असलेले कृतज्ञतापूर्ण काम. विवाह आणि कुटुंब सल्लागार विनिफ्रेड रेली म्हणतात महिला मला सांगतात की, 'मी एकटी होती, मी जोडीदाराशी जोडली गेली नव्हती, मला कधीच जोडीदाराशी जवळीक वाटली नाही आणि मला कमी लेखले गेले.' महिला सांगतात की पुरुषांची अशी इच्छा असते की एखाद्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघावे जेणेकरून त्यांना पुन्हा सेक्सी वाटेल."ज्या महिलांनी फसवणूक केलेली असती त्यांच्याविषयी आपले मत बनवण्यापूर्वी ही ४ कारणे पहिली पाहिजेत. म्हणजे त्यांच्या मनात काय चालले असेल हे समजू शकेल.

त्यांना दुर्लक्षित केल्याची भावना असते -

आपल्या समाजात, स्त्रिया घराची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी आहेत, असा अलिखित नियम आहे. प्रत्येक दिवशी पत्नी आपल्या कुटुंबासाठी करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी पत्नीला तिच्या वाट्याची प्रशंसा येत नाही. दिवसभर घेतलेल्या कामांची दखल न घेतली गेल्याने त्यांना आपण पत्नी किंवा एक समान जोडीदाराऐवजी घरकाम करणारी, आया किंवा अगदी कामवाली ठेवल्यासारखे वाटते. त्यामुळे कदाचित ती अशा एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते जो तिच्या सेवांबद्दल नाही तर ती कोण आहे याबद्दल तिचे कौतुक करतो.

एकटेपणा -

नात्यामध्ये, एका ठराविक कालावधीनंतर जोडीदार आपला सहवास रोमांचक बनवण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतात. जेव्हा पती दिवसातील जास्त कालावधी कामकाजासाठी दूर असतो किंवा कामात मग्न असतो तेंव्हा दोघांमधील संवाद कमी होतो. परिणामी कुटुंबातील इतर सदस्य अवतीभोवती असताना देखील पत्नीला भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटते.

त्यांना जवळीक हवी असते -

ती फक्त शारीरिक जवळीक असू शकत नाही. कदाचित त्यांना आपल्या पतीबरोबर पार्टीमध्ये जाण्याची इच्छा असेल किंवा सोफ्यात बसून चित्रपट बघायचा असेल किंवा एकत्र मजा करायची असेल. थोडक्यात, त्यांना घरातील काम करणारी मोलकरीण बनून राहण्याऐवजी पत्नी किंवा जोडीदाराचे आयुष्य पाहिजे असते. जेव्हा रिलेशनशिपमध्ये ही गरज पतीकडून पूर्ण होत नाही तेव्हा ती पोकळी दुसर्‍या जोडीदाराकडून भरून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.

त्यांचे लैंगिक जीवन समाधानकारक नसते -

नात्यांमध्ये लैंगिक संबंध महत्वाचे असतात, इतके की, त्याचा अभाव जाणवल्यास नात्यात अडथळा येऊ शकतो. हा एक गैरसमज आहे की केवळ पुरुषांनाच सेक्सची आवश्यकता असते किंवा त्यांनाच त्याचा आनंद घेता येतो. या गैरसमजामुळे पती पत्नीच्या इच्छेचा विचार करत नाही किंवा तिच्या गरजा जाणून घेऊ शकत नाही. नेमके हेच समाधान मिळवण्यासाठी कदाचित ती तिच्या नात्याबाहेर जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.