ETV Bharat / sukhibhava

'मर्स कोरोनाव्हायरस अँटीबॉडी'च्या विकासासाठी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून 'सेलट्रियन'ची निवड

author img

By

Published : May 14, 2020, 11:40 PM IST

Updated : May 21, 2020, 4:52 PM IST

मे २०१५ मध्ये पहिल्यांदा कोरियामध्ये मर्सचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सेलट्रियनने CT-P38चा अतिशय वेगवान अभ्यास करून औषध विकसित करण्यात यश मिळविले होते.

Celltrion selected as national project for development of MERS coronavirus antibody
'मर्स कोरोनाव्हायरस अँटीबॉडी'च्या विकासासाठी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून सेलट्रियनची निवड

हैदराबाद - संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात कार्यरत सेलट्रियन कंपनीने 'मर्स' (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) कोरोना विषाणूवरील अँटीबॉडी विकसित करण्यात यश मिळविले आहे. सेलट्रियन ही दक्षिण कोरियाची जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत कंपनी आहे.

मर्सचे निराकरण करण्यासाठी उपचार आणि तंत्रज्ञान विकसित करण्याला प्रोत्साहित करणे हे या राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. सेलट्रियनने मर्सवरील CT-P38 या अँटीबॉडीच्या विकासात गती आणली. यासाठी या प्रकल्पाला 3.7 अब्ज कोरियन होन इतका खर्च आला, ज्यात सरकारकडून 2.2 अब्ज होनची मदत मिळाली. पुढच्या टप्प्यात या अँटीबॉडीच्या नॉन-क्लिनिकल चाचण्या आणि पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्याच्या उद्दिष्टाने या वर्षापासून 2022 पर्यंत कोरिया विद्यापीठाशी सहकार्य करार करण्याची सेलट्रियनची योजना आहे.

2018 मध्ये सेलट्रियनने मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस संबंधित रेणूविषयी देशी आणि विदेशी पेटंट्सचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर, त्याच वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएंझा आणि इतर श्वसन रोग असोसिएशनने (आयएसआयआरव्ही) प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात, मर्सवर उपचार करण्यासाठी इतर बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी विकसित केलेल्या अँटीबॉडीजच्या तुलनेत CT-P38 सर्वात प्रभावी असल्याचे म्हटले होते.

मर्स वरील अँटीबॉडी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चासंबंधी सेलट्रियन सरकारसोबत चर्चा करणार असून सातत्यपूर्ण आणि स्थिर अँटीबॉडी विकसित करण्यासाठी मध्य-पूर्व देशांबरोबर भागीदारी करण्याची योजना आहे. तसेच अँटीबॉडीच्या विकासासाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी क्लिनिकल माहिती-एकत्रित करण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, जगभरातील २७ देशांमध्ये मर्स आढळून येतो. प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये हा विषाणू आढळून येत असल्याने तो तेथील देशी विषाणू बनला आहे. तर सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के केसेस आढळून येतात.

"मर्स हा प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये आढळून येतो. परंतु, कोरियामध्ये पुन्हा त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी सरकारच्या सहकार्याने ठोस उपचारपद्धती विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू," असे सेलट्रियनच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा - कुष्ठरोगावरील लस कोरोनावर ठरतीय प्रभावी; आयआयसीटीच्या संचालकांनी व्यक्त केला विश्वास..

Last Updated : May 21, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.