ETV Bharat / state

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून

आर्णी शहरातील कुंटणखाना चालवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याने ३२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून
author img

By

Published : Jun 3, 2019, 9:49 PM IST

यवतमाळ - आर्णी शहरातील कुंटणखाना चालवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याने ३२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या आईसह 2 आरोपींनी ड्रीम लॅन्ड सिटी परिसरात सोमवारी चाकूने भोसकून ही हत्या केली आहे. अकील शब्बीर खान (३२ रा.देऊरवाडा पुनर्वसन) आर्णी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची तक्रार मृताच्या मोठ्या भावाने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनेतील तीन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकील शब्बीर खान याचे सोनू रामटेक हिच्यासोबत गेल्या १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, सोनूची आई मंदा रामराव रामटेक (रा. ड्रीम लॅन्ड सिटी), सतीष जमदाडे (रा. देऊरवाडा पु.) आणि नितीन कदम (रा. पुसद) यांना हे प्रेम मान्य नव्हते. त्यामुळे तिघांनी संगनमत करून अकील शब्बीर खान खून केला.

यवतमाळमध्ये मुलीचे प्रेम मान्य नसल्याने युवकाचा साथीदारांच्या मदतीने खून

राहुल कोसळकर याचा वाढदिवस असल्याने आकाश गीरोळकर, अविनाश वाठोरे आणि मृत अकील खान हे 4 जण वाढदिवस साजरा करण्यासाठी माही रेस्टॉरंट आर्णी येथे गेले होते. त्यावेळी पार्टी करत असताना अकील कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे अकील दहा मिनिटात येतो, असे सांगून निघुन गेला. त्यानंतर तो बराच वेळ आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याला फोन केला. तेव्हा अकील मित्रांना म्हणाला, तुम्ही लवकर सोनाली रामटेकेच्या घरासमोर या. त्याचे मित्र त्या ठिकाणी पोहचले असता अकीलचा खून झाला होता. त्यावेळी त्यांनी अकीलला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अमरसिंग जाधव आणि दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

या घटनेतील मंदा रामटेके आणि नितीन कदम या 2 आरोपींना पोलिसांनी नांदेड येथून अटक करण्यात आली. तर उर्वरित 1 आरोपी सतीश जमदाडे फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक यशवत बाविस्कर यांनी आदिलाबाद आणि नागपुर येथे पथक रवाना केले आहे.

Intro:आर्णीत प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या युवकाचा खून
उच्चभ्रू वस्ती मधील घटना; अज्ञात युवकांनी आरोपीचे घर पेटविले Body:यवतमाळ : आर्णी शहरातील उच्चभ्रू वस्तीत कुटंनखाना चालविणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याने मुलीच्या आईसह दोघांनी ड्रीम लॅन्ड सिटी या परिसरात अकील शब्बीर खान रा.देऊरवाडा पुनर्वसन) याचा चाकू भोसकून खून केल्याची घटना पहाटे उघडकीस आली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची तक्रार मृतकाचा मोठा भाऊ शकील याने पोलीसात दिली आहे.
मृतक अकील शब्बीर खान याचे सोनू रामटेकेे हिच्या सोबत गेल्या एक वर्षा पासून प्रेम संबंध होते. मात्र सोनूची आई मंदा रामटेक (रा. ड्रीम लॅन्ड सिटी)आर्णी, सतीष जमदाडे (रा.देऊरवाडा पु.) आणि नितीन कदम (रा.पुसद) यांना दोघांचे प्रेम मान्य नव्हते.

मृतक अकील खान हा राहूल कोसळकर यांचा वाढदिवस असल्याने आकाश गीरोळकर, अविनाश वाठोरे आणि मृतक अकील खान हे तिघेजण वाढदिवस साजरा करण्यासाठी माही रेस्टॉरंट येथे गेले होते. पार्टी करित असतांना अकीलच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे अकील पार्टीच्या ठिकाणा वरून दहा मिनिटात येतो असे म्हणुन तो निघुन गेला. त्यानंतर बऱ्याच वेळापर्यंत मृतक अकील आला नसल्याने मित्रांनी त्याला फोन केला. तेव्हा अकील मित्रांना म्हणाला की तुम्ही लवकर सोनाली रामटेकेच्या घरासमोर या असे म्हणुन फोन ठेवला. सर्व मित्र त्याठिकाणी गेले असता सोनाली रामटेकेच्या घरासमोर आरोपी नितीन कदम, सोनालीची मंदा रामराव रामटेके आणि सतीश जमदाडे या तिघांनी संगनमत करून अकीलच्या छातीवर चाकूने भोसकून त्याला जागीच ठार केले. मित्रांनी अकीलला उचलून उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेले असता त्याला डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.

या घटनेतील मंदा रामटेके आणि नितीन कदम या दोन आरोपींना पोलिसांनी नांदेड येथून अटक करण्यात आली. उर्वरित एक फरार आरोपी सतीश जमदाडे शोधासाठी पोलीस
निरीक्षक यशवत बाविस्कर यांनी आदिलाबाद आणि नागपुर येेेथे त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव आणि दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Conclusion:या बातमीचे फुटेज
mh_ytl_nilesh_arni_marder आधीच या फाइल नेमणे पाठविले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.