यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चापडोह धरणावरून टाकण्यात आलेली जुनी भूमिगत पाईपलाइन आज (शनिवार) सकाळच्या सुमारास फुटली. डांबरीकरण केलेला रस्ता फोडून फुटलेल्या पाईपलाईन मधील पाणी प्रचंड वेगाने बाहेर आले. एखादा स्फोट किंवा भूकंप व्हावा त्याप्रमाणे पाणीपुरवठ्याची ही पाईपलाईन फुटली आणि त्याचवेळी तेथून दुचाकीने जाणारी एक तरुणी जखमी झाली.
-
#WATCH | Road cracked open after an underground pipeline burst in Yavatmal, Maharashtra earlier today. The incident was captured on CCTV. A woman riding on scooty was injured. pic.twitter.com/8tl86xgFhc
— ANI (@ANI) March 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Road cracked open after an underground pipeline burst in Yavatmal, Maharashtra earlier today. The incident was captured on CCTV. A woman riding on scooty was injured. pic.twitter.com/8tl86xgFhc
— ANI (@ANI) March 4, 2023#WATCH | Road cracked open after an underground pipeline burst in Yavatmal, Maharashtra earlier today. The incident was captured on CCTV. A woman riding on scooty was injured. pic.twitter.com/8tl86xgFhc
— ANI (@ANI) March 4, 2023
पाईपलाईन अतिशय जीर्ण: शाळा, महाविद्यालये याच मार्गावर असल्याने शिवाय पालकमंत्री संजय राठोड यांचेही जनसंपर्क कार्यालय शेजारीच असल्याने या मार्गावर नेहमीच प्रचंड वर्दळ असते. मात्र सुदैवाने पाईपलाईन फुटली त्यावेळी रस्त्यावर गर्दी नव्हती म्हणून मोठा अनर्थ टळला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला. १९७२ साली टाकलेली ही पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली होती, त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ती फुटली अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी दिली.
जमीनीतून स्फोट होऊन पाणी वर उडाले: अमृत या पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असताना या योजनेच्या कामामुळे शहरात काही लोकांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले आहेत. यवतमाळ शहरातील चापडोह पाणीपुरवठा योजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन आज सकाळी अनपेक्षितपणे फुटली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. जमिनीतून मोठा स्फोट होऊन पाणी वर उडाल्याचे त्यात दिसतंय. पाईलपलाईन फुटली त्यावेळी तेथून एक तरुणी बाईकवर जात होती. ती या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पाईपमध्ये साचलेले शेकडो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने हा संपूर्ण परिसरात पाणी साचले होते. या घटनेमुळे शहरात कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते, याचे प्रत्यंतर सामान्यांना आले.
जुनी पाईपलाईन: अँग्लो हिंदी हायस्कूल नजीक मजिप्राचे कार्यालय असून येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाकीत चापडोह धरणातून आलेले पाणी पोहचविण्यासाठी जुनी पाईपलाईन आहे. यवतमाळ शहरात निळोणा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी १९७२ पाईपलाईन टाकण्यात आली होती, दरम्यान, याच पाईपलाईनद्वारे चापडोह धरणातील पाणीपुरवठा होत होता.