यवतमाळ - महागाव तालुक्यातील पूस नदी काठावर तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली. मनोज वाठोरे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह झाला होता.
खून झाल्याची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटना स्थळाचा पंचनामा केला. यावेळी पूस नदी काठावर नागरिकांनी गर्दी केली होती. मृताच्या शरीरावर सात घाव आहेत. खून प्रकरणात संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. खुना मागील कारण कळू शकलेले नाही. पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत.