यवतमाळ - राहुल गांधी प्रचारासाठी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत होतात. अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे. उमरखेड येथे भाजप उमेदवार नामदेव ससाणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - मुख्यमंत्री कार्यालयाविरुद्ध अतुल लोंढे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार
राज्यात मोठया प्रमाणात भाजपने विकास कामे केली आहेत. त्यामुळे ही विकास कामे पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करून सत्ता द्या. असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. शिवाय या भागातील आमदार राजू नजरधने यांचे तिकीट कापल्यानंतर सुद्धा ते भाजपमध्ये आहेत. पक्षाने मला खूप काही दिले त्यामुळे पक्ष माझ्या आई सारखा आहे. असे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे कौतुक केले.