ETV Bharat / state

'टी-वन' वाघीण ठार घटनेची वर्षपूर्ती; नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार - 1 year completed to t1 tigeress killed

वाघिणीला ठार मारण्याची वर्षपूर्ती झाली. या कालावधीपासून परिसरामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही. याचाच अर्थ टी-वन वाघिणीच्या हल्ल्यांमध्येच गरीब शेतकरी, शेतमजुरांचे बळी गेले हे सिद्ध होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार
author img

By

Published : Nov 3, 2019, 1:09 PM IST

Updated : Nov 3, 2019, 2:12 PM IST

यवतमाळ - राळेगाव, पांढरकवडा परिसरामध्ये १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी वन वाघिणीला 2 नोव्हेंबरला मध्यरात्री ठार करण्यात आले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने शूटर असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

नवाब पिता-पुत्रांनी परिसरात ठाण मांडून गरिबांचे जीव वाचविले. मात्र, वन विभागाने त्यांना दुर्लक्षित ठेवले. त्यामुळे टी-वन वाघिणीला ठार मारण्याच्या वर्षपूर्तीला नवाब पिता-पुत्र आणि त्यांच्या पथकाचा सत्कार ग्रामस्थांनी केला. सरकारने सहाय्य केले नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून 21 हजार रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

'टी-वन' वाघीण ठार घटनेची वर्षपूर्ती; नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार

वाघिणीला ठार मारण्याची वर्षपूर्ती झाली. या कालावधीपासून परिसरामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही. याचाच अर्थ टी-वन वाघिणीच्या हल्ल्यांमध्येच गरीब शेतकरी, शेतमजुरांचे बळी गेले हे सिद्ध होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्याने देशभर वादंग झाला. शूटर नवाब पितापुत्रांवर टीकेची झोड उठली होती. मात्र, यवतमाळच्या ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती, त्या ग्रामस्थांनी शूटर नवाब पिता-पुत्र आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. 'कधीही गावात न आलेल्या तथाकथित प्राणीमित्र आणि राजकीय पक्षाच्या महानगरातील पुढाऱ्यांनी वनविभाग आणि शूटरवर केवळ आरोप केले. मात्र, शूटर नवाबच्या पथकाने परिसरात मुक्काम ठोकून टी-वन वाघिणीचा बंदोबस्त केल्यामुळे सत्काराचे आयोजन केले,' असे ग्रामस्थांनी सांगितले.

Intro:Body:यवतमाळ: राळेगाव, पांढरकवडा परिसरामध्ये १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी वन वाघिणीला 2 नोव्हेंबरला मध्यरात्री ठार करण्यात आले. या
घटनेला एक वर्ष पुर्ण झाले त्यानिमित्ताने शूटर
असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. नवाब पिता पुत्रांनी परिसरात ठाण मांडून गरिबांचे जीव वाचविले. तरी देखील वनविभागाने त्यांना दुर्लक्षित ठेवले. त्यामुळं टी वन वाघिणीला ठार मारण्याच्या वर्षपूर्तीला नवाब पिता पुत्र आणि त्यांच्या पथकाचा भावपूर्ण सत्कार ग्रामस्थांनी केला. सरकारने सहाय्य केले नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून 21 हजार रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द करन्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ग्रामस्थांनी केली. वाघिणीला ठार मारण्याची वर्षपूर्ती झाली. या कालावधीपासून परिसरामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही. याचाच अर्थ टी वन वाघीण हिच्या आतंकानेच गरीब शेतकरी शेतमजुरांचे बळी गेले हे सिद्ध होत आहे. तथाकथित प्राणीमित्रांसाठी ग्रामस्थांकडून शूटरचा जल्लोषात सत्कार ही सणसणीत चपराक ठरली आहे. प्राणिमित्र संस्थांनी सरकारवर दबाव आणल्याने मानवी वस्तीत शिरलेल्या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होऊ शकत नाही. शिवाय या संस्थांचे आर्थिक स्रोत विदेशातून असल्याचा घणाघाती आरोप नवाब शाफत अली खान यांनी केला. टी वन च्या एका बछड्याचा बंदोबस्त लावण्यात आल्याने ग्रामस्थ भयमुक्त झाले आहे. तरी देखील एक बछडा आणि वाघाची दहशत परिसरात आहेत. एकीकडे नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्याने देशभर वादंग झाल्यानंतर, आणि शुटर नवाब पितापुत्रांवर टीकेची झोड उठविल्या गेल्यानंतर दुसरीकडे यवतमाळच्या ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती. त्या ग्रामस्थांनी शुटर नवाब पितापुत्र आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. कधीही गावात न आलेल्या तथाकथित प्राणीमित्र आणि राजकीय पक्षाच्या महानगरातील पुढाऱ्यांनी वनविभाग आणि शुटरवर केवळ आरोप केले. मात्र शुटर नवाबच्या पथकाने परिसरात मुक्काम ठोकून टी वन वाघिणीचा बंदोबस्त केल्यामुळे ग्रामस्थांनी वर्षपूर्तीला ह्या सत्काराचे आयोजन केले होते.

बाईट - अंकुश मूनेश्वर, सरपंच, वेढशी
बाईट - नवाब शाफत अली खान, शूटर Conclusion:
Last Updated : Nov 3, 2019, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.