ETV Bharat / state

पाच वर्षापूर्वीच शाळेचे छत उडाले...तेव्हापासून एकाच वर्गखोलीसह व्हरांड्यात भरते शाळा - आदिवासी विद्यार्थ्यांना

राळेगावमधील झोटींगधरा शाळेचे छत पाच वर्षापूर्वीच उडाले. आज इतकी वर्षे झाली तरी कोणीही लक्ष दिलेले नाही. आता शाळेच्या वर्गखोली मध्ये 7 ते 8 फूट उंच झाडे तयार झाली आहेत. पण अशा परिस्थितीतही येथील शिक्षिका मात्र आपल्या अध्यापनाचं कार्य प्रामाणिकपणे करत आहेत.

यवतमाळ मधील झोटींगधरा शाळेची व्यथा
author img

By

Published : Jul 16, 2019, 11:53 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव मधील झोटींगधरा शाळेचे छत पाच वर्षापूर्वी वादळात कोसळले. आज पाच वर्षे उलटून गेले तरी अजूनही कोणी लक्ष दिलेले नाही. पण अशा परिस्थितीतही या शाळेतील शिक्षिका एकच वर्गखोली आणि व्हरांड्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

यवतमाळ मधील झोटींगधरा शाळेची व्यथा

झोटींगधरा हे गाव शंभर टक्के आदिवासी असणारे कोलाम समाजातील लोकवस्तीचे गाव आहे. इथे वर्ग एक ते चार पर्यंत 30 विद्यार्थी शिक्षण घेतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने जिल्हा परिषदेने शाळा उघडल्या खऱ्या, मात्र शाळेची अवस्था कशी आहे याकडे वर्षानुवर्षे कोणीच पाहत नाही. झोटींगधरा शाळेचे छत पाच वर्षापूर्वी वादळात उडून गेले. वारंवार तक्रार, अर्ज, विनंत्या करूनही या शाळेकडे कोणीही लक्ष दिले नाही. आता या शाळेच्या वर्गखोली मध्ये 7 ते 8 फूट उंच झाड तयार झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत आणि व्हरांड्यात शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षिका आहेत. शाळेचे छत पडल्यानंतर ते दुरुस्त करून द्या, म्हणून अनेकदा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकाऱ्यांना, पंचायत समिती राळेगाव यांना यासंदर्भात माहिती दिली. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे उन्हाळा असो, की पावसाळा विद्यार्थ्यांना एकत्र एकाच वर्गात आणि व्हरांड्यात शिक्षण घ्यावे लागते, असे येथील शिक्षिकांनी सांगितले.

शाळेचे छत उडाले ते दुरुस्ती न करता पाच वर्षे झाली. मात्र शाळेसाठी वॉल कंपाऊंड तयार व्हावे म्हणून विटा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना वर्गखोली हवी की वॉल कंपाऊंड ? हे आता शिक्षण विभागाला कोण सांगणार, हा खरा प्रश्न आहे.

Intro:एकाच वर्गखोली अन वरांड्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेBody:यवतमाळ : जिल्ह्यात जिल्हा परिषदेची अशी एक शाळा आहे, ज्या शाळेचे छत पाच वर्षापूर्वी वादळात कोसळले. आणि नंतर त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. आता याच शाळेच्या वर्गखोली मध्ये 7 ते 8 फूट उंच झाडे तयार झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागते. इतकेच नव्हेतर कधी व्हरांड्यात तर कधी गोधळात शिक्षण घ्यावे लागत आहे. ही शाळा आहे
राळेगाव तालुक्यातील झोटींगधरा येथील.

विशेष म्हणजे या शाळेत व्हरांड्यात वर्ग एक आणि दोनचे विद्यार्थी,एका खोलीमध्ये वर्ग तीन आणि चारचे विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेत आहे. या शाळेची ज्या वर्गखोलीवरील छत उडाले ते दुरुस्ती न करता पाच वर्षे झाली. मात्र, त्याकडे अजूनही कोणी लक्ष दिले नाही. मात्र येथे शाळेसाठी वॉल कंपाउंड तयार व्हावे म्हणून विटा मागविण्यात आल्या आहेत. मात्र शाळेचे छत कोसळल्याने ती वर्ग खोली आजही अडगडीत पडली आहे. आज विद्याथ्याना वर्गखोली हवी की वोल कंपाऊंड हे आता शिक्षण विभागाला कोण सांगणार. पाच वर्षात या शाळेतील वर्गखोली
मध्ये मोठाली झाड तयार झाली आहेत.

झोटींगधरा हे गाव शंभर टक्के आदिवासी कोलाम समाजातील रहिवासी लोकवस्तीचे गाव आहे. आणि इथे एक ते चार पर्यंत 30 विद्यार्थी शिक्षण घेतात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा. या दृष्टीने जिल्हा परिषद शाळा उघडल्या मात्र, तिथे या शाळेत अशी अवस्था झाली त्याकडे वर्षानुवर्षे कुणीच पाहत नाही. येथे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दोन शिक्षिका आहे.
शाळेच छत पडल्या नंतर दुरुस्त करून द्या म्हणून अनेकदा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचायत समिती राळेगाव यांना यासंदर्भात माहिती दिली, पत्रव्यवहार केला. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आणि आता शाळेत भिंत व्हाव्ही म्हणून विटा रेती आणली आहे .
येथे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात विद्यार्थ्यांना एकत्र एकाच वर्गात शिक्षण घ्यावे लागते. असे इथल्या शिक्षिका यांनी सांगितले.
आता या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास अडचणीतुन मार्गक्रमण करीत होत राहील का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
Conclusion:बाईट : प्रेमलता बोदाडे
शिक्षिका
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.