ETV Bharat / state

यवतमाळ काँग्रेसकडून ऑक्सिजन काॅन्संट्रेटरचे वाटप, अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार

काँग्रेसतर्फे लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरजू सलून व्यावसायिकांना धान्यवाटप करण्यात आले. तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड सेंटरमध्ये 16 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर वितरित करण्यात आले.

yawatmal congress distributed oxygen concentrators to covis centers
यवतमाळ काँग्रेसकडून ऑक्सिजन काॅन्संट्रेटरचे वाटप
author img

By

Published : Jun 6, 2021, 7:32 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात ज्या शेतकरी परिवारात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबाला पेरणीसाठी बियाणे वितरित करण्यात आले. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार व नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकाराने काँग्रेस पक्षातर्फे बियाणांचं वाटप करण्यात आले. तसेच लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरजू सलून व्यावसायिकांना धान्यवाटप करण्यात आले. ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड सेंटरमध्ये 16 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर वितरित करण्यात आले.

यवतमाळ काँग्रेसकडून ऑक्सिजन काॅन्संट्रेटरचे वाटप...

कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य ज्यांनी केले त्या 23 कोरोना योद्ध्यांचा या छोटेखानी कार्यक्रमात प्रत्येकी सात हजार रूपये सन्मान राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्व.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री माणिकराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डाॅ.वजाहत मिर्झा, माजी मंत्री वसंतराव पुरके, बाळासाहेब मांगुळकर, प्रविण देशमुख, उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.