ETV Bharat / state

पुसद मतदारसंघ : 'निलय' 'इंद्रनील' नाईक बंधुत होणार काटें की टक्कर

author img

By

Published : Oct 5, 2019, 1:32 PM IST

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड असलेल्या पुसद मतदारसंघात भाजपचा 'कमळ' फुलवण्याचा मनसुबा आहे. यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांच्या विरोधात निलय नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघ

यवतमाळ - विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव गड असलेल्या पुसद मतदारसंघात भाजपने कमळ फुलवण्याच्या इराद्याने जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांच्या विरोधात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवून नाईक घराण्यातच संघर्ष उभा केला आहे. शिवसेनेकडून भाजपने ही जागा स्वतःकडे मागून घेतली आहे. त्यामुळे नाईक घराण्यातील इंद्रनील मनोहर नाईक व निलय मधुकर नाईक या दोन चुलत बंधूतील ही लढत अत्यंत चुरशीची होईल.

पुसद विधानसभा मतदारसंघात होन नाईक बंधुत होणार लढाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मर्जीतील आमदार मनोहर नाईक यांनी पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा सतत उंच ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याने विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. परंतु, पुसदमध्ये मात्र राष्ट्रवादीचे मनोहर नाईक हे ६५ हजार मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विदर्भातील एकमेव आमदार आहेत. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजतागायत पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचे कायम वर्चस्व राहिले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व विद्यमान आमदार मनोहर नाईक या जनाधार असलेल्या नेत्यांनी पुसदचे सातत्याने नेतृत्व केले. आता आमदार मनोहर नाईक यांनी स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता कार्यकर्ते, मतदारांचा कानोसा घेत कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांना पुढे केले आहे.

हेही वाचा... दिग्रस आणि आर्णी मतदार संघात भाजपची बंडखोरी

निवडणुकांची धुमश्चक्री सुरू होताना इंद्रनील नाईक यांनी शिवबंधन बांधण्याची तयारी केली होती. परंतु, शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे व कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेत मनोहर नाईक यांनी इंद्रनील नाईक यांना 'सिग्नल' दिला नाही. भाजपमधील वाढत्या इन्कमिंग नंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी इंद्रनील यांना उमेदवारी व मंत्रिपदाच्या 'रेड कार्पेट'चे आश्वासक शब्द दिल्याचे बोलले जात होते, मात्र राष्ट्रवादीत राहण्याची भूमिका मनोहर नाईकांनी घेतली.

हेही वाचा... शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

निवडणुकीत इंद्रनील नाईक नवखे आहेत, मात्र युवा वर्गात त्यांची 'क्रेझ' आहे. तसेच त्यांच्या पाठीशी मुरब्बी राजकारणी पिता आहेत. त्या मानाने नीलय नाईक यांना राजकीय अनुभव आहे. आमदारकीची संधी न मिळाल्याने निलय नाईक यांनी यापूर्वी २००९ मध्ये काका मनोहर नाईक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत बंडाळी केली होती. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राष्ट्रवादीत परतल्यानंतर आमदारकीची संधी धुसर दिसल्याने नीलय यांनी भाजपची वाट धरली. अडीच वर्षांपूर्वी निलय नाईक यांनी भाजपत प्रवेश केला. एक वर्षापूर्वी ते विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले. दरम्यान, त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढवली.

हेही वाचा... 'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट​​​​​​​

मनोहर नाईक हे धुरंधर नेते असून त्यांचे ग्रामीण भागात कार्यकर्ते व मतदारांचे अतुट जाळे आहे. आमदार नाईक यांच्या समोर गड कायम राखण्याचे आव्हान आहे तर भाजपाच्या निलय नाईक यांना मतदारसंघात पाय घट्ट रोवण्याचे स्वप्न आहे. विधान परिषदेचे चार वर्ष शिल्लक असूनही त्यांनी ' रिस्क' घेतली आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. भाजपच्या जिल्हा आदिवासी विकास आघाडीचे सचिव ज्ञानेश्वर बेले यांनी बहुजन महासंघात प्रवेश केला असून वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून पैलवान असलेल्या बेले यांना निवडणूक आखाड्यात उतरविले आहे. तर 'मनसे'च्या वतीने अभय गडम रिंगणात आहेत. या चौरंगी सामन्यात 'इंद्रनील-नीलय' यांच्यातील लढत चुरशीची ठरणार, एवढे निश्चित.

हेही वाचा.... उमरखेड मतदारसंघात आमदार नजरधने यांना भाजपचा ठेंगा, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Intro:Body:यवतमाळ : विदर्भातील एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पुसद मतदार संघात भाजपाचा 'कमळ' फुलविण्याचा मनसुबा आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या विरोधात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार निलय नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवून नाईक घराण्यात संघर्ष उभा केला आहे. शिवसेनेकडून भाजपने ही जागा स्वतःकडे मागून घेतली असून नाईक घराण्यातील इंद्रनील मनोहर नाईक व निलय मधुकर नाईक या दोन चुलत बंधूतील ही लढत अत्यंत चुरशीची होईल.
......
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मर्जीतील आमदार मनोहर नाईक यांनी पुसद विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा सतत उंच ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारल्याने विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. परंतु ,पुसद मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक ६५ हजार मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विदर्भातील एकमेव आमदार आहेत. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजतागायत पुसद विधानसभा मतदारसंघ नाईक घराण्याचे कायम वर्चस्व राहिले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व विद्यमान आमदार मनोहर नाईक या जनाधार असलेल्या लोकनेत्यांनी पुसदचे सातत्याने नेतृत्व केले. आता आमदार मनोहर नाईक यांनी स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता कार्यकर्ते, मतदारांचा कानोसा घेत कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांना पुढे केले आहे.
नाईक घराण्याचे विधानसभेत नेतृत्व ययाती नाईक व इंद्रनील नाईक यांच्यापैकी कोण करणार ? या प्रश्नाचे उत्तरही आता मिळाले असून इंद्रनील 'नाईक गड' लढविणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणुकांची धुमश्चक्री सुरू होताना इंद्रनील नाईक यांनी शिवबंधन बांधण्याची तयारी केली होती. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधामुळे व कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेत आमदार मनोहर नाईक यांनी इंद्रनील नाईक यांना 'सिग्नल' दिला नाही. भाजपातील वाढत्या इन्कमिंग नंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी इंद्रनील यांना उमेदवारी व मंत्रिपदाच्या 'रेड कार्पेट'चे आश्वासक शब्द देत अखेर पर्यंत मनधरणी करण्यात आली.मात्र, राष्ट्रवादीत राहण्याची मनोहररावांनी भूमिका घेतली.शुक्रवारी इंद्रनील नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान, आमदार मनोहर नाईक व कुटुंबीयांनी ग्रामीण भागात प्रचाराची राळ उठविली आहे.
निवडणूकीत इंद्रनील नाईक नवखे आहेत.मात्र, युवा वर्गात त्यांची 'क्रेझ' आहे.त्यांच्या पाठीशी मुरब्बी पितामह आहेत.नीलय नाईक यांना राजकीय अनुभव आहे.आमदारकीची संधी न मिळाल्याने निलय नाईक यांनी यापूर्वी २००९ मध्ये काका मनोहर नाईक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत बंडाळी केली होती. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राष्ट्रवादीत परतल्यानंतर आमदारकीची संधी धुसर दिसल्याने नीलय यांनी भाजपची कास धरली. अडीच वर्षांपूर्वी निलय नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. एक वर्षापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले. दरम्यान, त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढविली. आमदार मनोहर नाईक हे धुरंधर नेते असून त्यांचे ग्रामीण भागात कार्यकर्ते व मतदारांचे अतुट जाळे आहे. आमदार मनोहर नाईक यांच्या समोर गड कायम राखण्याचे आव्हान आहे तर भाजपाच्या निलय नाईक यांना मतदारसंघात पाय घट्ट रोवण्याचे स्वप्न आहे.विधान परिषदेचे चार वर्ष शिल्लक असूनही त्यांनी ' रिस्क' घेतली आहे.या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. भाजपाच्या जिल्हा आदिवासी विकास आघाडीचे सचिव ज्ञानेश्वर बेले यांनी बहुजन महासंघात प्रवेश केला असून वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून पैलवान असलेल्या बेले यांना निवडणूक आखाड्यात उतरविले आहे. तर 'मनसे'च्या वतीने अभय गडम रिंगणात आहेत. या चौरंगी सामन्यात 'इंद्रनील-नीलय' यांच्यातील लढत चुरशीची ठरणार, एवढे निश्चित

mh_ytl_04_pusad_nilay_nike_byte_vis_7204456

mh_ytl_05_pusad_indranil_nike_byte_vis_7204456
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.