यवतमाळ - वणी विधानसभा मतदारसंघातील बेलोरा टी पॉईंट येथे पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. वणी येथील संतोष वाटेकर हा दुचाकीने रक्कम घेऊन जात होता. ही कारवाई शिरपूर ठाण्याचे ठाणेदार सतीश चावरे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - अन्नसुरक्षेसाठी रासायनिक शेतीला पर्याय नाही; झिरो बजेट शेतीवर आरसीएफचेही प्रश्नचिन्ह
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता एसएस टी पॉईंट बेलोरा येथे ठाणेदार सतीश चावरे, हवालदार अभ्यंकर, योगेश ढाले, अनिल सुरपाम यांच्या पथकाने रक्कम घेऊन जाणाऱ्या संतोष वाटेकरला (रा. विठ्ठलवाडी, वनी) दुचाकीसह (एमएच 34 पीपी 2346) पकडले व रक्कम जप्त केली. नाक्यावरच्या बॅगेची तपासणी केली असता यात 25 लाख आढळून आले. यावेळी या रकमेची कुठलीच माहिती त्यांच्याजवळ आढळून आली नाही. पोलिसांनी तात्काळ फ्लाईंग स्कॉडला पाचारण केले. पुढील कारवाई वणी नायब तहसीलदार वैभव पवार, मंडळ अधिकारी नितीन बांगडे, पीएसआय गोपाल जाधव, विस्तार अधिकारी सुरेश पाजारे, मंडळ अधिकारी उल्हास निमकर, पोलीस शिपाई मनोज शिरगणवार यांनी केली.
हेही वाचा - पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाला एफडीएचा दणका
जप्त करण्यात आलेली रक्कम ही आयकर विभागाकडे हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती वणी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी शरद जव्हाले यांनी सांगितली.
हेही वाचा - राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड