यवतमाळ - खापरी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यवतमाळ एलसीबी (स्थानिका गुन्हे पथक) पथकाने धाड टाकून १४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने 51 हजार 330 रूपयाची रोख, 6 दुचाकी आणि 12 मोबाईल असा एकूण 3 लाख 21 हजार 430 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन साबापूरेसह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार, घाटंजी तालुक्यातील खापरी येथील सचिन साबापुरे याच्या घराच्या वरच्या माळ्यावर मोठ्या प्रमाणात जुगार भरत होता. याबाबतची गोपनीय यवतमाळ एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून यवतमाळ एलसीबी पथकाने घाटंजीतील खापरी गाठून राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकली. यावेळी 14 जुगारी जुगार खेळताना एलसीबी पथकाला आढळून आले.
आशिष भोयर, सुबोध साठे, राजेंद्र ठाकरे, प्रशांत सोनूले, संतोष चव्हाण, विनोद साबापुरे, गजानन गाढवे, संदीप भोयर, सुरेश आडे, शुभम देठे, रवींद्र भेदूरकर, अमोल मलकापुरे, नंदुकुमार भुरभुरे अशी अटक करण्यात आलेल्या चौदा जणांची नावे आहे.
घाटंजी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा एलसीबी प्रमुख पोलीस निरिक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मंगेश भोयर, घाटंजीतील पोलीस उपनिरिक्षक किशोर भुजाडे, सफौ साहेबराव राठोड, महेश पांडे, सुरेंद्र वाकोडे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस करीत आहे.