यवतमाळ- आधीच्या सरकारने दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. त्यातही बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. आणि आता या शासनाने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी मार्च २०१५ नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरून त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कमसुध्दा या योजनेसाठी पात्र असेल. या योजनेंतर्गत प्रति शेतकरी २ लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल. मार्च २०२० पासून योजनेचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येईल. असे जरी असले तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला सातबारा कोरा होईल, अशी आशा लागली होती. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून २ लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आल्याने डोक्यावरील सरसकट कर्जमाफी कधी होईल, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हेही वाचा- #CAA Protest : यवतमाळात मुस्लीम बांधवांचा मोर्चा; विधेयक रद्द करण्याची मागणी