ETV Bharat / state

'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ 102 जणांना डिस्चार्ज; 24 नवे कोरोनाबाधित - corona in yavatmal

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 102 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यवतमाळ कोरोना अपडेट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 102 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
author img

By

Published : Aug 6, 2020, 7:58 AM IST

यवतमाळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 102 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 36 झाली आहे. तसेच बुधवारी 24 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडलीय.

बुधवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये शहरातील लक्ष्मीनगर येथील 65 वर्षीय महिला आणि ढाणकी रोड, उमरखेड येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील श्रीरामपूरमधील एक पुरुष व पिंपळगाव येथील एक महिला, पुसद शहरातील वसंतनगर येथील तीन महिला व एक पुरूष, उमरखेड शहरातील दोन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्यातील घारफळ येथील एक महिला, नेर शहरातील तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरूष व एक महिला, पांढरकवडा येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील नेहरू चौक येथील एक पुरुष व एक महिला, वंजारीफैल येथील एक पुरूष, संजीवनी हॉस्पीटल येथील एक पुरूष, वडगाव येथील एक महिला, विश्वकर्मा नगर पिंपळगाव येथील दोन महिला, पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 440 ॲक्टिव्ह रुग्ण होते. यातील एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या 439 झाली. यात आज नव्याने 25 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही संख्या 464 झाली. मात्र यापैकी एकाचा मृत्यू आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 102 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 361 आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 309 झाली आहे. यापैकी 912 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 36 मृत्यूंची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 131 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 76 नमुने तपासणीसाठी पाठवले. सुरुवातीपासून आतापर्यंत 21 हजार 732 नमुने पाठवले असून यापैकी 17 हजार 559 प्राप्त तर 4 हजार 173 अहवाल पेंडिंग आहेत. तसेच 16 हजार 250 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आलेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.