ETV Bharat / state

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट; कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा

author img

By

Published : May 4, 2021, 10:49 PM IST

ग्रामीण भागातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच तालुक्यातील माणिकवाडा येथील तपासणी शिबिराला अचानक भेट दिली.

covid Status Review Collector Amol Yedge
नेर कोविड स्थिती आढावा अमोल येडगे भेट

यवतमाळ - ग्रामीण भागातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच तालुक्यातील माणिकवाडा येथील तपासणी शिबिराला अचानक भेट दिली. यावेळी या दोन्ही रुग्णालयांतील भोंगळ कारभाराविषयी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.

हेही वाचा - जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ

गावकऱ्यांना तपासणीबाबत जागृत करा

जिल्हाधिकाऱ्यांनी नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या तपासणी शिबिराची पाहणी केली. या केंद्रांतर्गत किती गावांचा समावेश होतो, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल, तसेच गावचे सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांना तपासणीबाबत जागृत करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांना तपासणीकरीता प्रवृत्त करा. तसेच, येथे किती पात्र लोकांचे लसीकरण करण्यात आले आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.

मृत्यूचे प्रमाण कमी करा

तालुकास्तरीय समितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर तपासणी, तसेच लवकर उपचार आवश्यक आहे. त्यामुळे, तालुकास्तरीय, तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी टेस्टींग वाढवावी. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी केली. येथे त्वरित 10 ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्याचे निर्देश दिले, तसेच कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या अडीअडचणींबाबत विचारपूस केली.

हेही वाचा - दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता घरपोच लसीकरणाचे केंद्र उभारा; खासदार धानोरकरांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.