यवतमाळ - कोल्हापूर आणि सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातील नागरिक सरसावले आहेत. तर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळमधील पांढरकवडा येथील नागरिकही सरसावले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरांतील विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे.
यासाठी हेल्पिंग हँन्ड्सकडून मदतनिधी गोळा करण्यात आला आहे. या मदत फेरीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील हेल्पिंग हँन्ड्स व काही शाळा, सामाजिक संघटना, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. यावेळी लोकसहभागातून रक्कम मदत गोळा करण्यात आली. तसेच यावेळी रोख रक्कम, धान्य, कापड आणि वस्तूरूपात मदत गोळा करण्यात आली. ही रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात आली.