ETV Bharat / state

यवतमाळ विधानपरिषद निवडणूक ; भाजप मतदारांची जंगल सफारी

author img

By

Published : Jan 28, 2020, 4:05 PM IST

यवतमाळ विधानपरिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजार थांबवण्यासाठी भाजपने नगरसेवकांना सहलीवर पाठवले आहे. पेंच अभयारण्यात 31 जानेवारीपर्यंत सर्व मतदार तिथे असतील. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी मतदारांना नागपूरला आणले जाईल.

भाजपच्या मतदारांची जंगल सफारी
भाजपच्या मतदारांची जंगल सफारी

यवतमाळ - विधानपरिषदेची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकांमध्ये मतांच्या विभाजनाचे राजकारण केले जाते. शिवाय उमेदवारांना पळवून राजकिय गणित जुळवले जातात. त्यामुळे आपल्या मतदारांना सुरक्षितस्थळी हलवण्याची पद्धत सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या मतदारांना देखील आलिशान ट्रॅव्हल्सने वेगवेगळ्या ठिकाणी परिवारासह सहलीला रवाना करण्यात आले आहे.

भाजपच्या मतदारांची जंगल सफारी

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकित महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एकूण 489 मतदार असून महाविकास आघाडीकडे 250 पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर भाजपकडून देखील 275 मतदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदार फुटण्याच्या भीतीने आज भाजपने अनेक ठिकाणच्या नगरसेवक आणि इतर मतदारांना पेंचला जंगल सफारीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे सर्व नगरसेवक 30 जानेवारी पर्यंत सहलीवर असणार आहे. त्यानंतर 31 जानेवारीला नागपूर येथे या सर्व सहलीला गेलेल्या मतदारांना एकत्रित करून मतदानासाठी पाठविले जाणार आहे.

भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना मतदार फुटण्याची भीती आहे. शिवाय घोडेबाजाराची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदारांना सहलीला पाठवण्याचा फंडा उपयोगात आणला जात आहे. भाजप उमेदवाराबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, बाहेरून आलेले उमेदवार बाहेरच राहतील आणि आपल्या गावाला परत जातील, अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडीच्या उमेदवारावर भाजपचे नेते माजी मंत्री आ. मदन येरावार यांनी केली आहे. असे असले तरी निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Intro:Body:यवतमाळ: विधान परीषदेची पोट निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून महाविकास आघाडी आणि भाजपाच्या मतदारांना आलिशान ट्रॅव्हल्स ने वेगवेगळ्या ठिकाणी परिवारासह सहहीला रवाना करण्यात आले आहे.
यवतमाळ विधान परिषद निवडणूकित महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी निवडणूक रिंगणात आहेत. तर त्याच्या विरोधात भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली.
दोन्ही उमेदवार तगडे असून या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत एकूण 489 मतदार असून त्यात महाविकास आघाडी कडे 250 पेक्षा अधिक मतदार असल्याचे सांगण्यात येत आहे तर भाजप कडून सुद्धा 275 मतदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मतदार फुटण्याच्या भीतीने आज अनेक ठिकाणच्या नगरसेवक मतदारांना भाजपाने पेंचला जंगल सफारी साठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
हे नगरसेवक 30 जानेवारी पर्यन्त सहलीला असून 31 जानेवारीला नागपूर येथे या सर्व सहलीला गेलेल्या मतदारांना एकत्रित करून मतदानासाठी पाठविले जाणार आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना मतदार फुटण्याची मोठी भीती असल्याने हा उपाय केला जात असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुद्धा तेजीत आल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार जिंकून येण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. आता
निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार हे निवडणूक निकाला नंतर च स्पष्ट होईल.

भाजप उमेदवार बद्दल अनेक अफवा पसरवल्या जात असून अश्या अफवान वर विश्वास ठेवू नका बाहेररून आलेले उमेदवार बाहेरच राहतील. आणि आपल्या गावाला परत जातील अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडीच्या उमेदवारावर भाजपचे नेते माजी मंत्री आमदर मदन येरावार यांनी केली.

बाईट- मदन येरावार, माजीमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.