ETV Bharat / state

सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व्यवस्थित रेशन देत नसल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील जांब येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानादाराकडे सोय करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.

women agitation against goverment ration shopkeeper
सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
author img

By

Published : Dec 14, 2019, 6:09 PM IST

Updated : Dec 16, 2019, 9:49 AM IST

यवतमाळ - सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व्यवस्थित रेशन देत नसल्याचा आरोप करत जांब येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानादाराकडे सोय करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.

सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'

गावातील जो परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानदार आहे. तो व्यवस्थित साहित्य देत नाही, अशी महिलांनी तक्रार केली होती. सरकारी स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्याबाजारात विक्रीस नेताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याचा परवाना निलंबित करण्यात आला नाही. अशा दुकानदाराकडील परवाना काढून तो गावातील दुसऱ्या दुकानदाराला देण्यात यावा अशी मागणी महिलांनी केली. यासोबतच, तो दुकानदार उद्धट वागणूक देतो, असा आरोप महिलांनी केला. यासंदर्भातही दखल घेण्याची मागणी महिलांनी यावेळी केली. यावेळी आमदार मदन येरावार यांनी महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Intro:Body:यवतमाळ : जांब येथे असलेल्या रास्तभाव दुकानदार माल देत नसल्याचा आरोप करत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. रास्तभाव धान्य दुकानातील कार्ड कमी करुन ती दुसऱ्या रास्तभाव दुकानाला जोडण्यात यावी, अशी मागणी महिलानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
जांब येथील ज्या परवानाधारकाकडे नोंदी आहेत. ते रास्तभाव दुकानदार साहित्य देत नाही. संबंधित रास्तभाव दुकानदार माल काळयाबाजारात नेत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीे होती. तरी परवाना निलंबित करण्यात आला नाही. अशा रास्तभाव दुकानदाराकडील कुपनाची नोंद काढून गावातील दुुसऱ्या रास्तभाव दुकानदाराकडे ती करण्यात यावी, दुकानदार उद्धट वागणूक देतो, असा आरोप महिलांनी केला. या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी बैठकीसाठी आलेले आमदार मदन येरावार यांनी महिलांसोबत भेट घेतली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले. यावेळी जांब येथील अनेक महिला उपस्थित होत्या. महिलांनी रास्तभाव दुकानदार विरोधात आरोप केले, त्याचीही दखल घेण्याची मागणी केली.

बाईट - सुनीता शेरे, ग्रामस्थ
बाईट - मीना रोकडे, ग्रामस्थ
Conclusion:
Last Updated : Dec 16, 2019, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.