ETV Bharat / state

पुसदमध्ये दागिने लुटत महिलेची हत्या; दोन दिवसानंतर आढळला मृतदेह - पुसदमध्ये महिलेची हत्या

दोन दिवसांपासून ही महिला घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. अखेर त्या महिलेचे प्रेत महादेव मंदिरालगत असलेल्या जोड रस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात आढळून आले.

हत्या
हत्या
author img

By

Published : Sep 1, 2021, 6:44 PM IST

Updated : Sep 1, 2021, 6:52 PM IST

यवतमाळ - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा उसाच्या शेतात मृतदेह आढळून आल्याची घटना पुसद तालुक्यातील आरेगाव येथे उघडकीस आली आहे. येथील बेलफुल वाटणारी वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आज (बुधवारी) अखेर तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला असून अज्ञात चोरट्याने सोन्या व चांदिचे दागिने हिसकावून घेऊन खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

पुसदमध्ये दागिने लुटत महिलेची हत्या

पुसदपासून आठ किलोमीटर अंतरावरील आरेगाव येथील यशोदाबाई कोंडबा सातव (६०) ही विधवा महिला दररोज लोणी ह्या गावात बेलफुल वाटायची. सोमवार दरम्यान पाऊसाचा जोर असल्याने काही काळ लोणी येथे थांबली. पावसाने उघडीप देताच आपल्या गावाकडे निघाली. परंतु दोन दिवसांपासून ही महिला घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. अखेर त्या महिलेचे प्रेत महादेव मंदिरालगत असलेल्या जोड रस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात आढळून आले. महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याची पाने, हातातील चांदीचेकडे व पाटल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून घेऊन तिचा पाय बांधला आणि खून केला असल्याचा संशय प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तिच्या मागे एक विवाहित मुलगी असून घटनास्थळी पुसद शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

हेही वाचा - रोहतक हत्याकांड : एकुलत्या एक मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून; पोलिसांचा खुलासा

Last Updated : Sep 1, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.