ETV Bharat / state

वाघाचा बंदोबस्त करा, ग्रामस्थांचा वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव - यवतमाळ वाघ न्यूज

पांढरकवडा वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पाटणबोरी परिसरातील गावांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे. वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वनाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव घातला.

Villagers surround forest officiars and police officers vehicles in yawatmal
ग्रामस्थांचा वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव
author img

By

Published : Aug 7, 2020, 9:15 PM IST

Updated : Aug 7, 2020, 9:45 PM IST

यवतमाळ - पांढरकवडा वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पाटणबोरी परिसरातील गावांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे. वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वनाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव घातला. अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी गावांमध्ये वाघाने मुक्काम ठोकला असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत आहेत. मागील महिनाभरात बैल, बकऱ्यांची शिकार या वाघाने केली आहे.

वाघाचा बंदोबस्त करा, ग्रामस्थांचा वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव

या भागातील शेतीकामे प्रभावित झाली असून, वाघ पशुपालकांच्या जनावरांचा फडशा पाडीत आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना केल्या जात नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) उपवनसंरक्षक के. अभर्णा यांच्यासह वरिष्ठ वनाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या भागातील गावात बैठक आयोजीत केली होती. मात्र, बैठकीत ग्रामस्थांना सूचना केल्यानंतर व गावांना तारकुंपण देण्याचे आश्वासन दिल्यानंतरदेखील ग्रामस्थ वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी करीत आक्रमक झाले. त्यांनी वनाधिकारी व पोलिसांचे वाहन अडवून घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना पांगवले. याप्रकरणी पोलीस कारवाई सुरू झाली आहे.

Last Updated : Aug 7, 2020, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.