ETV Bharat / state

चंद्रपूर-वणीत होता महासागर, पृथ्वीवरील अतिप्राचिन जिवांची निर्मिती येथे झाल्याचा दावा

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पैनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोंलाईटची जीवाश्मे आढळली आहेत. या सजीवांना शास्त्रीय भाषेत क्रोकोकल्स (Chroococcales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oscillatoriales) असे म्हणतात.

चुनखडकात सापडले अतिशय दुर्मिळ जीवाश्म
चुनखडकात सापडले अतिशय दुर्मिळ जीवाश्म
author img

By

Published : Jun 22, 2021, 12:06 PM IST

Updated : Jun 22, 2021, 1:34 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अतिप्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चूनखडक आढळतात. याच चुनखडकात २०० ते १५० कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळात इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्टेरीया (स्ट्रोमाटोंलाईट) या सूक्ष्मजीवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी हे शोधून काढले आहेत.

चुनखडकात सापडले अतिशय दुर्मिळ जीवाश्म

पृथ्वीवर प्रथम विकसित झालेला जीव

पृथ्वीची उत्पत्त्ती ४.६ अब्ज वर्षापूर्वी झाली, परंतु सजीवांची उत्पत्ती मात्र ३ ते ४ अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत. त्यांना स्ट्रोमाटोंलाईट (Stromatolite)असे म्हणतात. या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया (Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १५० ते २०० कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Neoproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात. तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. तो पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेला जीव होता. पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा दिसतात स्पष्ट

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पैनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococcales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oscillatoriales) असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आणि चीखलांचे रुपांतर चुनडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली-बोर्डा परिसरात आढळली असल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्मे प्रथमच आढळले

प्रा. सुरेश चोपणे हे मुळचे वणीचे असून ते या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्मे शोधून काढली होती. १५ वर्षापूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा त्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी ५ ठिकाणी पाषाण युगीन स्थळे, तर ४ ठिकाणी कोट्यावधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली असून चंद्रपूर येथे त्यांचे स्वत:चे शैक्षणिक दृष्ट्या ‘अश्म, जीवाश्म संग्रहालय' स्थापन केले आहे. चुनखडकात असलेली ही अतिशय महत्वाची स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्मे प्रथमच आढळून आली.

हेही वाचा - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची शापित कहानी, 'यामुळे' जगभर प्रसाराला झाला विलंब

Last Updated : Jun 22, 2021, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.