ETV Bharat / state

'ते' दोघे 700 किलोमीटर चालत घरी गेले खरे; मात्र, गावकऱ्यांनी गावाबाहेरच ठेवले - यवतमाळ बातमी

घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम मजूर पत्करत आहेत. असाच 700 किलोमीटरचा प्रवास करून गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र, गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील जिल्हा परिषदेचा शाळेत त्यांना मुक्काम करावा लागला आहे. पुढचे 14 दिवस त्यांना शाळेतच क्वारंटाईन होऊन राहावे लागणार आहे.

युवक
युवक
author img

By

Published : Apr 7, 2020, 9:37 PM IST

यवतमाळ - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे देशात अनेक मजुरांची मोठी अडचण झाली आहे. घरापासून शेकडो किलोमीटर अंतरावरील मजुरांची पाऊले आपल्या घराकडे वळली आहेत. घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम मजूर पत्करत आहेत. असाच 700 किलोमीटरचा प्रवास करून गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र, गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील जिल्हा परिषदेचा शाळेत त्यांना मुक्काम करावा लागला आहे. पुढचे 14 दिवस त्यांना शाळेतच क्वारंटाईन होऊन राहावे लागणार आहे.

बोलताना युवक

सुरेश रामकृष्ण रामपूरे (वय 25) आणि विशाल देवीदास मडावी (वय 18) अशी या तरुण मजुरांची नावे आहेत. हे दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथे ते एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही अन् आश्रयही नाही. म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र यायचे कसे? वाहतूक बंद. राज्याचीच काय, जिल्ह्याचीही सीमा ओलांडण्यावर बंदी आहे. शेवटी त्यांनी गुजरात ते दारव्हा प्रवास पायीच करण्याचे ठरविले आणि 31 मार्चच्या रात्री गावाकडे निघाले.

नवागाव दिंडोळी ते कोरदोडा हे 700 किलोमीटरचे अंतर पायी चालत आल्यावर त्यांना गुजरात पोलिसांनी पकडले. धाकदपटशा करीत पोलीस वाहनातून उचलगावपर्यंत आणून सोडले. हे गाव गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे. इथून पुढे रस्त्याने गेले तर पोलीस पुन्हा अडवतील म्हणून हे दोन्ही तरुण चक्क शेत, जंगल अशा मागार्ने वाटचाल करीत नंदुरबारपर्यंत पोहोचले. तेथे एक टेम्पो मिळाला. त्यातून ते जळगावात आले. पुन्हा दुसरे वाहन पकडून धुळ्यात आले. मग पायी चालत मूर्तिजापूर-बडनेरा-नेर असा त्यांनी प्रवास केला. अन् शेवटी 4 एप्रिलच्या मध्यरात्री ते दारव्हा तालुक्यातील चिकणी या आपल्या मूळ गावात दाखल झाले.

येण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकांना फोन केला. मात्र, नातेवाईकांनी कोरोनाची परिस्थिती पाहून नातेवाईक व गावकऱ्यांनी ताठर भूमिका घेत त्यांना गावाबाहेरच थांबविले. रात्रभर गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात थांबवून सकाळीच दारव्हा येथे उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने गावात परत आणले गेले. मात्र, अजूनही दक्षता म्हणून 14 दिवस त्यांना घराऐवजी गावातील शाळेत ठेवले जाणार आहे. तलाठी, पोलीस पाटील आदींच्या हजेरीत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोघांना त्यांच्या घरून जेवणाचा डबा पोहचविण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.