ETV Bharat / state

Two Murders In Yavatmal : यवतमाळमध्ये 12 तासात खूणाच्या दोन घटना; एकीककडे पत्नीची हत्या तर दुसरीकडे बापाचा खून

यवतमाळमध्ये खूणाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एकीककडे नवऱ्याने पत्नीची हत्या तर दुसरीकडे मुलाने बापाचा खून केल्याचे समोर आले आहे. पहिली घटना नेर कोल्हापूर इथे उघडकीस आली. तर दुसरी घटना दिग्रस तालुक्यातील बेलोरा येथून उघडकीस आली.

Yavatmal murder
यवतमाळमध्ये खूण
author img

By

Published : Jul 24, 2022, 6:11 PM IST

यवतमाळ - यवतमाळमध्ये खूणाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत ( Two Murders In Yavatmal ) . नवऱ्यानेच पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी दुपारच्या सुमारास नेर कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे. कमलाबाई मोहन राठोड वय पन्नास वर्ष असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू होती. तर दुसरी घटना जन्मदात्या बापाची मुलानेच हत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील ( yavatmal Digras Taluka ) बेलोरा येथे २३ जुलैच्या सकाळी उघडकीस आली. आईला वडील नेहमी मारहाण करीत होते. त्यामुळेच हत्या केल्याची कबुली संतप्त झालेल्या मुलाने पोलिसांना दिली. शुक्रवारीच मुलाने हत्या केली होती. मात्र शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वडीलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार - मृतक गणेश महादेव काशीदकर (वय ६० वर्ष रा.बेलोरा ) याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत नेहमी बायकोला मारहाण ( Drunken husband beaten wife ) करीत होता. एक महिन्यापासून हे कुटुंब चिंचोली येथे वास्तवास आले. परंतु शेती बेलोरा येथे असल्याने मृतक गणेश काशीदकर चिंचोली येथून बेलोरा येत होते. अशातच शुक्रवारी आईला, बापाने मारहाण केली यावरून आरोपी मुलगा वैभव गणेश काशिदकर (वय- ३२) याने रागाच्या भरात वडिलाला संपवायचे या उद्देशाने ट्रकची टायर खोलण्याची लोखंडी रॉड घेऊन शेतात वडिलाला पाहायला गेला. परंतु ते तेथे आढळून आले नाहीत. तेव्हा त्याने थेट बेलोरा येथील घर गाठून खाटेवर झोपलेल्या वडीलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून ठार केले. डोक्यावर इतका जबर मार होता की, डोक्यातून मेंदू पडून होता.

मुलाकडून खूमाची कबूली - शुक्रवार दुपारी ३ वाजता पासून बापाला ठार केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने आपल्यावर नाव येऊ नये म्हणून बहाना करून शनिवारी आरोपी मुलाने रात्री माझे वडील कुठे गेले अशी विचारणा त्याने त्याच्या चुलत भावाला केली. तेव्हा बेलोरा येथील घरात बघितले तर खाटेवर मृत अवस्थेत वडील पडून असल्याचे दाखवून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून माझ्या वडिलांचा कुणीतरी खून केला अशी बतावणी पोलिसांसमोर केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी उलट तपासणी करीत खाकीचा धाक दाखवताच त्याने वडीलाचा खून केल्याची कबुली दिली ( son killed Father ) . बाप नेहमी दारूच्या नशेत आईला मारहाण करीत असल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर , पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात - या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ( Body in custody of relatives ) दिला. मृतकाला पत्नी, दोन मुले असून मोठा मुलगा जम्मू येथे बीएसएफमध्ये कार्यरत आहे. लहान मुलाने बापाला ठार केल्याने आरोपी मुलगा वैभव गणेश काशीदकर याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर करीत आहे.

हेही वाचा - Kabbadi Player Killed In Dharavi : धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या; तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.