आर्णी : आर्णी पोलिस स्टेशन (Arni Police Station) अंतर्गत येत असलेल्या महागाव तालुका दिग्रस येथे गणपती विसर्जन (Ganesh Immersion) करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू (Death by drowning in a drain) झाल्याची खळबळ जनक घटना ( Sensational events) दिनांक ९ सप्टेंबर रोजी शुक्रवार ला संध्याकाळी ६ च्या दरम्यान घडली आहे. गोकुळ दत्ता टेटर (वय १७) आणि सोपान बबनराव गावंडे (वय 17) दोघेही रा. महागाव अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत. शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघे जन आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जन ही करण्यात आले त्या नंतर ते घरी परले. गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी दोघे जन परत नाल्यावर गेले असता नाल्यात बुडाले त्यांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेने आर्णी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महागाव येथे शोककूळ पसरला आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप: गणपती विसर्जना दरम्यान नाल्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी २० मिनिट त्यांना बघितलेच नाही,ऑक्सीजन लावले नाही डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे आमच्या मुलांचे जीव गेल्याचा गंभीर आरोप मृताचे नातेवाईक करीत आहे. त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.