यवतमाळ : जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून ( Policeman murder at main police headquarter ) केला. यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली Policeman murder at Yavatmal आहे.
पोलीसाची हत्या झाल्याने सामान्याचे काय ? आठ महिन्यात 55 खून निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले असता, अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्यालय गेट जवळ आले आणि खून ( Policeman murder at main police headquarter ) केला. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. जिल्हा खुणाच्या सत्राने जिल्हा हादरला असून आतापर्यंत आठ महिन्यात 55 खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चक्क पोलीसाची हत्या झाल्याने सामान्याचे काय ? असा प्रश्न सध्या यवतमाळकर विचारत आहे.
पोलिसांचा वचक संपला की काय ? यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असून आता पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्याचाच निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. निशांत खडसे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन मारेकऱ्यांनी हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्याचा खून केला. पोलीस मुख्यालयातच हा खून झाल्याने अवधुतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून अभि बोंडे व कुंदन मेश्राम या दोन्ही आरोपींना अटक केली. जिल्ह्यात दरदिवशी खुनाच्या घडत असल्याने पोलिसांचा वचक संपला की काय ? असा प्रश्न निर्माण झाला ( accused arrested in Policeman murder ) आहे.