ETV Bharat / state

बत्तीस एकराच्या विस्तीर्ण मैदानावर पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१६ फेब्रुवारी) महिला बचत गटांच्या महिला सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पांढरकवडा येथे येणार आहेत.

author img

By

Published : Feb 14, 2019, 7:20 PM IST

सुरक्षा व्यवस्था पाहणी

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१६ फेब्रुवारी) महिला बचत गटांच्या महिला सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पांढरकवडा येथे येणार आहेत. त्यांच्या सभेच्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. साधारणत: ३२ एकर परिसरामध्ये ही सभा पार पडणार असून सभास्थळी किमान ३ लाख महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत.

नुकतेच विशेष सुरक्षा दलाने (एसपीजी) या मैदानाचा ताबा घेतला असून पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, यांनी या मैदानाची पाहणी केली. हे सभेचे मैदान व हेलिपॅड परिसर एसपीजीकडे सुपूर्त केला आहे. या विराट सभेकरिता ३० बाय ६० चा मंच उभारण्यात आला आहे. तसेच संपूर्ण ग्राउंडमध्ये ग्रीन मॅट टाकण्यात येणार आहे.

असा असेल पोलीस बंदोबस्त-

मैदानाकडे येण्यासाठी विविध १५ रस्ते असून २ व्हीआयपी रस्ते असणार आहे. मंचावरती १ मोठी एलईडी स्क्रीन तर ग्राऊंडमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी १० एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मागील ३ दिवसांपासून विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासह ४ अप्पर पोलीस अधीक्षक, २७ पोलीस उपअधीक्षक, ९० पोलीस निरीक्षक, २८० पोलीस उपनिरीक्षक, २१०० पोलीस कर्मचारी यांच्यासह एसपीजी, एनएसजी, एसआयडी, एसआरपी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तैनात करण्यात आली आहे.

undefined

सभेदरम्यान कुठलेही आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कटाक्षाने जिल्ह्यातील आंदोलकांवर बारीक नजर ठेवून आहेत. पांढरकवडा शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक ५० मीटर वरती पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहेत.

Intro:बत्तीस एकराच्या विस्तीर्ण मैदानावर पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारीBody:यवतमाळ: शनिवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सभेच्या तयारीअंतिम टप्प्यात अली आहे. साधारणत ३२ एकर परिसरामध्ये ही सभा पार पडणार आहेत. या ठिकाणी किमान तीन लाख महिला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. नुकतेच एसपीजी यांनी या मैदानाचा ताबा घेतला असून पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, यांनी या मैदानाची पाहणी केली आणि हे सभेचे मैदान व हेलिपॅड परिसर एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) यांच्याकडे सुपूर्त केले. या विराट सभेत करिता ३० बाय ६० हा डायस उभारण्यात आला आहे. संपूर्ण ग्राउंड मध्ये ग्रीन मॅटीन टाकण्यात येणार आहे. मैदानाकडे येण्यासाठी विविध १५ रस्ते असून दोन वीआयपी रस्ते असणार आहे. डायस वरती १ मोठ्या स्वरूपात एलईडी स्क्रीन तर ग्राऊंडमध्ये नागरिकांना दिसण्यासाठी १० एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मागील तीन दिवसांपासून विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासह चार अप्पर पोलीस अधीक्षक, २७ पोलीस उपअधीक्षक, ९० पोलीस निरीक्षक, २८० पोलीस उपनिरीक्षक, २१०० पोलीस कर्मचारी यांच्यासह एसपीजी, एनएसजी, एसआयडी, एसआरपी आधी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आली आहे. सभेदरम्यान कुठलाही आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कटाक्षाने जिल्ह्यातील आंदोलकांवर बारीक नजर ठेवून आहेत. पांढरकवडा शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक ५० मीटर वरती पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.