ETV Bharat / state

'त्या' तिघांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह; विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज - corona in yavatmal

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातील तीन नागरिकांचे नमुने पॉझिटीव्ह आले होते. मात्र आता 14 दिवसानंतर त्यांचे दोन नमुने निगेटिव्ह आले आहे.

yavatmal corona news
'त्या' तिघांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह; विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज
author img

By

Published : Mar 28, 2020, 11:22 PM IST

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातील तीन नागरिकांचे नमुने पॉझिटीव्ह आले होते. मात्र आता 14 दिवसानंतर त्यांचे दोन नमुने निगेटिव्ह आले आहे. या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आज डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. संबंधित तिन्ही रुग्णांना पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली होम क्वारंटाईन करणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

दुबईवरून आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लक्षणे असल्यामुळे 12 मार्चला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नागपूरमधील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह तर उर्वरीत सहा जणांचे निगेटिव्ह आले होते. यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार या तिघांचे उर्वरीत दोन नमुने 14 दिवसानंतर तपासणीसाठी पुन्हा पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार तिन्ही नागरिकांचे नमुने 26 मार्च रोजी नागपूरला पाठवण्यात आले. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे उर्वरीत नमुने पुन्हा नागपूरला पाठवण्यात आले. तिनही नागरिकांचा हा शेवटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो 28 मार्च रोजी प्राप्त झाला.

यामुळे आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पुढील 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असून आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करणार आहे. शुक्रवारी रात्री एका नागरिकाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात केवळ एक नागरिक आहे. तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 89 झाली आहे.

नागरिकांनी कलम 144 चे सक्तीने पालन करावे

जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे आता जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. यासाठी सर्व आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी प्रशंसा केली आहे. तसेच जिल्ह्यात संचारबंदी सुरू असून कलम 144 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.