ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले; पैनगंगा नदीला पूर - Yavatmal Rain 2020 News

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल (सोमवार) रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इसापूर धरणाचे 13ही दरवाजे उघडण्यात आल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. तर, पुसद- हिंगोली हा राज्यमार्ग पैनगंगेला आलेल्या पुरामुळे आज सकाळी 11 पासून बंद झाला आहे.

इसापूर धरणाचे 13  दरवाजे उघडले
इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले
author img

By

Published : Sep 22, 2020, 4:38 PM IST

Updated : Sep 22, 2020, 5:08 PM IST

यवतमाळ : येथे काल(सोमवार) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली. त्यामुळे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून 768.021 कुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातील 13ही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे.

इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल (सोमवार) रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे, इसापूर धरणाचे 2, 14, 8 क्रमांकाचे दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. तर, 7, 9, 6, 10, 5, 11, 4, 12, 3 व 13 या क्रमांकाचे दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. या तेराही दरवाज्यातून पेनगंगा नदीपात्रात 768.021 क्युसेक (27123 क्युसेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 935.4460 द.ल.घ.मी.असून पाणी पातळी 440.70 मीटर इतकी आहे.

हे धरण 100 टक्के भरले असून सकाळी 11 वाजतापासून 13 गेटद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुसद, उमरखेड, महागाव (जि.यवतमाळ), कळमनुरी (जिल्हा हिंगोली), हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट (जिल्हा नांदेड) या तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर, पुसद- हिंगोली हा राज्यमार्ग पैनगंगेला आलेल्या पुरामुळे आज सकाळी 11 वाजतापासून बंदच झाला आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या शेंबाळपिंपरी नजीकच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली; परजिल्ह्यावर राहावे लागतेय अवलंबून

Last Updated : Sep 22, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.