ETV Bharat / state

theft in Yavatmal : घरफोडीच्या घटनेत 22 लाखांची चोरी; पोलिसांकडून मौल्यवान वस्तूंसह रोख जप्त, दोघांना अटक

यवतमाळमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली ( theft in Yavatmal ) आहे. चोरांनी घरफोडी करून सोने, चांदी, रोकड असा ऐवज जप्त केला होता. पोलिसांनी त्यांना शोधून अटक करत त्यांच्यावर कारवाई केली ( Police seized Gold silver cash from thieves ) आहे.

Yavatmal thief
यवतमाळ घर फोडी
author img

By

Published : Dec 23, 2022, 2:37 PM IST

यवतमाळ घर फोडी

यवतमाळ : यवतमाळमध्ये दोन चोरट्यांना ( theft in Yavatmal ) हुडकून काढून पोलिसांनी त्यांच्याकडून 390 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड असा एकूण 22 लाख 67 हजार 53 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई 21 डिसेंबरला दुपारी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. यासंबंधीची माहिती आज गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड : शेर अली ऊर्फ रहिम मोती सैय्यद (22) रा. इंदिरानगर, यवतमाळ आणि विक्की किसन सारवे (24) रा. गौतमनगर, यवतमाळ अशी अटकेतील चोरट्यांची नावे ( Two arrested in theft incident ) आहेत. येथील अरुणोदय सोसायटीतील हिरालाल ऊर्फ पन्ना गयाप्रसाद जयस्वाल (42) यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील काढून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तब्बल आठ लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख 85 हजारांची रोकड असा एकूण 15 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ( Police seized Gold silver cash from thieves ) होता. ही घटना 11 डिसेंबरला सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध भादंवि 454, 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने घराच्या अवतीभोवतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी केली. तेव्हा दोन चोरटे नखशिखांत वस्त्रे परिधान करून असलेले आढळून आले होते. शिवाय, काही अंतरावर त्यांचे वाहन आढळले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी बारकाईने तपास केला.

दोघांनी घरफोडी केली : अट्टल चोरटा शेर अली आणि विक्की सारवे या दोघांनी घरफोडी केल्याचे पुढे आले. पोलिसांनी शिघ्रगतीने तपासचक्रे फिरवून त्या दोघांना विविध ठिकाणांहून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्या दोघांनी पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. शिवाय, घरफोडीतील दोन लाखांची रोकड विक्की सारवे याच्याकडे तर 390 ग्रॅम दहा मिली वजनाचे सोन्याचे दागिने शेर अलीच्या भद्रावती येथे वास्तव्याला असलेल्या बहिणीकडे ठेवल्याचे त्यांनी उघड केले. त्यावरून पोलिसांनी चोरीतील 20 लाख 67 हजार 53 रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलमधील आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ( Police arrested thieves ) केली.

पाच दिवसांची पोलीस कोठडी : अरुणोदय सोसायटीतील धाडसी घरफोडीत अट्टल चोरटा शेर अली आणि विक्की सारवे या दोघांना अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने त्यांना स्थानिक न्यायालयापुढे हजर केले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यादरम्यान घटनेत वापरलेले वाहन आणि अन्य परिस्थितीजन्य पुरावे पोलीस त्यांच्याकडून गोळा करणार असल्याचे सांगण्यात आले. अरुणोदय सोसायटीतील घरफोडीचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांकडून लाखानी यांच्याकडील घरफोडीतील ऐवज जप्त केला जाणार असल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.