यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या सावरगड शेतशिवारात बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. Practicing Police Recruitment ही घटना 6 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. suspicious body of young woman found मृत तरुणी ही यवतमाळ येथे पोलिस भरतीची तयारी करत असल्याचे Yavatmal Crime सांगितले जात आहे.
मिसिंगची तक्रार दाखल मृत तरुणी यवतमाळ येथे पोलीस Yavatmal Police भरतीची तयारी करत होती. तरुणी ही भाड्याने राहत होती. गेल्या 3 दिवसापासून तिचा मोबाईल बंद होता. तसेच 4 सप्टेंबर 2022 पासून रुमवरून बेपत्ता होती. याप्रकरणी तरुणीच्या आईने अवधुवाडी पोलिसात Awadhuwadi Police मिसिंगची तक्रार देखील दिली होती. तसेच तरुणी रुम मेटची चौकशी केली असता, ती पार्टी करण्यासाठी जात असे सांगून रुमवरून निघून गेली होती. अशात 6 सप्टेंबरला सायंकाळी सावरगड शेतशिवारात तिचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांचा तपास घटनेनंतर यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी Yavatmal Rural Police घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय पाठविण्यात आला. आज शवागारात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सूरुवातीला पोलिसांनी खुनाच्या संशय व्यक्त केला होता. मात्र मृतदेहावर संशयास्पद काहीही आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी रासयनिक विश्लेषणासाठी विसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. त्यामूळे पोलिसांनी तृर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.