यवतमाळ - गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचे वेध लागले होते. तब्बल 58 वर्षानंतर सर्वात मोठे सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव खगोल अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी घेतला. स्काय वॉच ग्रुपने येथे सूर्यग्रहण बघण्यासाठी पुढाकार घेतला आणि विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचा दर्शनाचा आनंद दिला. सूर्यग्रहण पाहून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला मूठ माती दिली आहे.
ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहणाचे नीट दर्शन होऊ शकले नाही, अशी खंत काहींनी व्यक्त केली. ग्रहणाविषयी समाजात अजूनही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र, स्काय वॉच ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नाश्ता केला.
हेही वाचा - ग्रहण ग्रहण सूर्यग्रहण..! विद्यार्थ्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद
काय आहे सूर्यग्रहण -
सूर्यग्रहण 10 वर्षांतून एकदा येते. पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये फिरत असतानाच सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालीत असते. दुसरीकडे चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती चक्कर घालत असतो. त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी येतो. तेव्हा पृथ्वीवर सूर्य काही प्रमाणात दिसण्याचे बंद होते. या खगोलीय घटनेमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही एका रेषेत असतात. याच घटनेला सूर्यग्रहण असे म्हटले जाते. आजचे कंकणाकृती सूर्यग्रहण 58 वर्षांनंतर आलेले सर्वात मोठे सूर्यग्रहण होते.