ETV Bharat / state

दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा, अनेक संसार उघड्यावर - hailstorm

जिल्ह्यातील दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला असून यात अनेक गावांचे नुकसान झाले आहे. लाखखिंडसह खेड, नायगाव, उमरी आदी गावांत वादळाने थैमान घातले.

वादळामुळे झालेले नुकसान
author img

By

Published : Jun 8, 2019, 6:53 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला असून यात अनेक गावांचे नुकसान झाले आहे. लाखखिंडसह खेड, नायगाव, उमरी आदी गावांत वादळाने थैमान घातले. यात दगड व भिंत अंगावर कोसळल्याने ४ जण जखमी झाले आहेत. विजेच्या कडकडाटासह वादळाने लाखखिंड गावाला जबर तडाखा दिल्यामुळे निम्मे गाव उद्धवस्त झाले आहे.

वादळामुळे झालेले नुकसान

वादळामुळे विद्युत खांब तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही गावे अंधारात असल्याने गावकऱयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खेड, नायगाव, उमरीसह लाखखिंड गावाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. एकाच आठवड्यात लाखखिंडला दुसऱयांदा वादळाचा जोरदार तडाखा बसला. क्षणार्धात या गावात होत्याचे नव्हते झाले. कुडाची घरे उडून गेली तर विटामातीच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत.

गावातील पन्नास पेक्षा जास्त घरांवरील छत कोसळले आहेत. घरावरील छतच उडून गेल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर साहित्य उघड्यावर पडले आहे. घरे उद्धवस्त झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. वादळाचा फटका गावातील शाळांनाही बसला आहे. या नुकसानीमुळे नागरिकांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तातडीने अहवाल सादर करून मदतीसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.

Intro:दारव्हा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा Body:यवतमाळ : दारव्हा तालुक्याला वादळी पावसाने तडाखा बसला असून यात अनेक गावचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरही जमीनदोस्त झाले, तर 4 जण जखमी झाले. विजेच्या कडकडाटासह वादळाने लाखखिंड गावाला जबर हादरा दिला. वादळात निम्मे गाव उद्धवस्त झाले. काही गावकरी जखमी झाले. लाखखिंडसह खेड, नायगाव, उमरी आदी गावांत वादळाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही गावे अंधारात असल्याने गावक-यांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेड, नायगाव, उमरी सह लाखखिंड गावाला पावसाचा जोरदार फटका बसला. एकाच आठवड्यात लाखखिडला दुस-यांदा वादळाचा जोरदार तडाखा बसला. क्षणार्धात या गावात होत्याचे नव्हते झाले. कुडाची घरे उडून गेली. विटामातीच्या घरांच्या भिंती पडल्या
आहे. गावातील पन्नासच्यावर घरांवरील छत कोसळले. टिनांवरील दगड व भिंतीचा मलबा अंगावर कोसळल्याने 4 जण जखमी झाले आहे. घरावरील छतच उडून गेल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर साहित्य नष्ट झाले. या गावातील अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहे. वादळाचा फटका गावातील शाळा, विद्युत खांबांनाही बसला. वीज खांब वाकले, तारा तुटल्या, त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. पावसामुळे झालेल्या नुकसनामुळे ग्रामस्थ चिंतातुर झाले असून अनेक नागरिकांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. आता प्रशासनाने नुकसान ग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू केले असून तातडीने अहवाल सादर करून मदतीसाठी प्रस्ताव तयार केल्या जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.