ETV Bharat / state

बस स्थानकात नागरिकांच्या जीवाशी खेळ, राज्य परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

आर्णी रोडवरील परिवहन महामंडळाच्या तात्पुरत्या बस स्थानकात दगड बसच्या चाकाखाली येऊन उसळत असल्याने अनेक प्रवासी जखमी होत आहे. यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

bus stand
बस स्थानकात नागरिकांच्या जीवाशी खेळ, राज्य परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Feb 28, 2020, 11:10 AM IST

Updated : Feb 28, 2020, 12:11 PM IST

यवतमाळ - शहरातील जुन्या बस स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने हे स्थानक आर्णी रोडवरील परिवहन महामंडळाच्या जागेवर तात्पुरते हलविण्यात आले आहे. या ठिकाणी असलेले दगड बसच्या चाकाखाली येऊन उसळत असल्याने अनेक प्रवासी जखमी होत आहे.

बस स्थानकात नागरिकांच्या जीवाशी खेळ, राज्य परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

उसळणाऱ्या या दगडांमुळे गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बसस्थानकामध्ये डांबरीकरण न करता बसची ये-जा सुरू आहे. शिवाय वाहतूक कोंडीही वाढली आहे. या समस्येवर राज्य परिवहन महामंडळाने कोणतीही उपाययोजना केली नाही.

हेही वाचा - ग्राऊंड रिपोर्ट : आदिवासी समाज सीएए आणि एनआरसीच्या कसोटीवर ठरणार नापास?

शहरातील नवीन बस स्थानक बांधण्यासाठी ठेकेदाराला ११ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पण हे काम नियोजित कालावधीत पूर्ण होईल का याबाबत साशंकता आहे. तोपर्यंत तरी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी केली जात आहे.

Last Updated : Feb 28, 2020, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.