ETV Bharat / state

गोवंश तस्करी करताना चार ट्रक पकडले; तीन ट्रॅक घटनास्थळावरून पसार - cow

कळंब येथून गाय बैल भरून ट्रक वसमतला नेण्यात येत होता. गोवंश तस्करांकडून कळंब, आर्णी, वसमत, नांदेड, टेकडी पोलिसांना या भागातून ट्रक नेण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता देण्यात येत असल्याची कबुली एका ट्रक चालकाने दिली.

गोवंश तस्करी करताना चार ट्रक पकडले; तीन ट्रॅक घटनास्थळावरून पसार
author img

By

Published : Jun 18, 2019, 12:19 PM IST

यवतमाळ - महागाव तालुक्यातील तिवरंग ते भोसा मार्गावरील भोसा गावाजवळ बैलाने भरलेले ४ ट्रक गोरक्षक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यातील 3 ट्रक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, १ ट्रक कार्यकर्त्यांनी अडवून ठेवल्याने ताब्यात घेण्यात आला. यावेळी चालकाने गोरक्षकांच्या अंगावर ट्रक घालन्याचा प्रयत्न केला. ट्रक आडवलेल्या कार्यकर्त्यांवर चालकाने चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला.

गोवंश तस्करी करताना चार ट्रक पकडले; तीन ट्रॅक घटनास्थळावरून पसार

कळंब येथून गाय बैल भरून ट्रक वसमतला नेण्यात येत होता. गोवंश तस्करांकडून कळंब, आर्णी, वसमत, नांदेड, टेकडी पोलिसांना या भागातून ट्रक नेण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता देण्यात येत असल्याची कबुली एका ट्रक चालकाने दिली. गोवंश तस्करीने भरलेले ट्रक यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना पोलिसांना हप्ता दिला जात असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची तक्रार पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गोरक्षक व शिवसेना पदाधिकारी करणार आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे तस्करीच्या ट्रक चालकांने पोलीस शिपायाला चिरडून टाकल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाचे तस्करी होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी भूमिका गोरक्षक समितीने घेतली आहे.

Intro:Body:गोवंश तस्करी करताना चार ट्रॅक पकडले;तीन ट्रॅक घटनास्थळा वरून पसार
यवतमाळ : महागाव तालुक्यातील तिवरंग ते भोसा गावा जवळ गाई व बैलाने भरलेले 4 ट्रक गोरक्षक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले.
यातील 3 ट्रक घटना स्थळावरून पळाले असून 1 ट्रॅक कार्यकर्त्यांनी अडवून ठेवल्याने ताब्यात घेण्यात आला. यावेळी ट्रक गोरक्षकांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रकचालकाने गोरक्षकवर चाकूने हल्ला चढविला. यात एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला. कळंब येथून गाय बैल हे जनावर भरून ट्रक वसमतला नेण्यात येत होते. गोवंश तस्कराकडून कळंब, आर्णी, वसमत, नांदेड, टेकडी पोलिसांना या भागातून ट्रक नेण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ता देण्यात येत असल्याची कबुली एका ट्रक चालकाने दिली. गोवंश तस्करीने भरलेले ट्रक यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना पोलिसांना हप्ता देत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गोरक्षक व शिवसेना पदाधिकारी करणार आहे. गत काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा तस्करीचा ट्रक चालकांनी पोलीस शिपायाला चिरडून टाकल्याची घटना दिल्याची ही घटना घडली होती. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाचे तस्करी होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा अशी भूमिका गोरक्षक समितीने घेतली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.