यवतमाळ - तिरूपती कंदकुरीवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 7 वर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. पांढरकवडा येथील तहसीलदारांना देवधरी ते केळापूर महामार्गावरील खड्ड्यांची दुरूस्ती करावी यासाठी शिवसेनेने निवेदन दिले होते. मात्र, याप्रकरणी तहसीलदारांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
हे ही वाचा - यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श गावाची वाट बिकट!
या महामार्गावरील खड्ड्यांची दुरूस्ती पुढील दोन दिवसात करण्यात आली नाही, तर केळापूर ते करंजी या रस्त्यावरील संपूर्ण खड्ड्यात वृक्ष लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य पंकज तोडसाम, माजी सभापती सुभाष राठोड, किशोर कनाके, शाहरूख खान, हनुमंतु कायपेल्लीवार, शिवा मेश्राम, बंटी तोडसाम, पवन अन्नेरवार,संतोष थोरात, नामदेव राठोड, परेश मडावी, अक्षय मांडवकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
हे ही वाचा - यवतमाळमध्ये 2 वळूंची दहशत; नगरपालिकेची बघ्याची भूमिका