यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील साखरा येथे सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी शिवराम पुताची मात्रे (68) या उमरखेड येथे राहाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
पाच रुपयाचे आमिष दाखवून केला अत्याचार -
आरोपीने पीडित मुलीस पाच रुपयाचे आमिष दाखवून घराजवळील बाजूच्या कोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. मात्र, मुलीने घरच्यांना सांगितल्याने या घटनेची माहिती झाली. आईवडिलांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारावरून उमरखेड पोलीस ठाण्यात आरोपीवर 376, 376 अ ब भादवि 4/8 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय संदीप गाडे, एपीआय बनसोड, रवी चव्हाण करीत आहेत.
हेही वाचा - कायद्याचा रक्षकच निघाला भक्षक, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस शिपायाची जेलमध्ये रवानगी