ETV Bharat / state

यवतमाळ : लोहारा येथील शाळेची भिंत कोसळली; 5 विद्यार्थी जखमी - यवतमाळ शाळा भिंत कोसळली

तुमसर तालुक्यतील लाहोरा या गावात स्व. रतिराम टेंभरे ही 5 ते 12 वी पर्यंतची शाळा आहे. घटनेच्या दिवशी शाळा नियमितपणे सुरु होती. विद्यार्थी अध्ययन करीत बसले असतांना अचानकपणे भिंत कोसळली. यात 5 विद्यार्थी जखमी झाले. शाळा प्रशासनाने शाळेतच डॉक्टर यांना बोलावून उपचार सुरू केले.

school wall collapsed in lohara in yawatmal district
लोहारा येथील शाळेची भिंत कोसळली
author img

By

Published : Feb 13, 2021, 3:45 PM IST

Updated : Feb 13, 2021, 4:01 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील लोहारा गावातील एका खासगी शाळेची इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. लोहारा येथील स्व. रतिराम टेंभरे हायस्कूल असे या खासगी शाळेचे शाळेचे नाव आहे. ही घटना 9 फेब्रुवारीला घडली. यानंतर शाळेने हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न केला. मात्र, जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याने हे घटना समोर आली.

याबाबतच्या प्रतिक्रिया.

मोठी दुर्घटना टळली -

तुमसर तालुक्यतील लाहोरा या गावात स्व. रतिराम टेंभरे ही 5 ते 12 वी पर्यंतची शाळा आहे. घटनेच्या दिवशी शाळा नियमितपणे सुरु होती. विद्यार्थी अध्ययन करीत बसले असतांना अचानकपणे भिंत कोसळली. यात 5 विद्यार्थी जखमी झाले. शाळा प्रशासनाने शाळेतच डॉक्टर यांना बोलावून उपचार सुरू केले. यात मयुरी नेवारे वय 13 वर्ष, सोनाली शिवरकर वय 13 हे जखमी झाले आहेत. उमाशंकर सपाटे याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तुमसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. हे सर्व विद्यार्थी आठवी वर्गात शिक्षण घेत आहेत.

घटना शाळा प्रशसनाच्या निष्काळजीमुळे घडली. तसेच जी भिंत कोसळली ती अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत आहेत. त्या भिंतीला भेगा पडल्याचे पालक, विद्यार्थी सांगतात. ही भिंत जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडली असती तर जीवित हानी झाली असती. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

हेही वाचा - पूजा चव्हाणसाठी समाजाने रस्त्यावर उतरावे, प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव

शाळेने घटना लपविण्याचा केला प्रयत्न -

ही घटना 9 फेब्रुवारीला घडली. मात्र, 4 दिवसानंतर ती उघडकीस आली आहे. शाळा प्रशासनाने याची साधी कल्पना जिल्हा प्रशासनाला दिली नव्हती. शाळा प्रशासन हे प्रकरण दड़पत असल्याचे समोर आले. मात्र, गंभीर इजा झालेल्या विद्यार्थीला खासगी रुग्णालयात दाखल केल्याने हे बिंग फुटले आहे. याबाबत प्रभारी मुख्याध्यापिका यांना विचारले असता, मी नवीन रुजू झाल्याने शासकीय नियमानुसार काय करावे, याची कल्पना नव्हती तसेच ही घटना खूप मोठी नाही असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी यांच्या कार्यवाहीकडे लक्ष -

या घटनेविषयी आपण सर्व अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी यांना पाठविल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांनी दिली. या घटनेची चौकशी करून कार्यवाही करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळेतील जीर्ण भिंतीविषयी शाळा संचालक आणि शाळा व्यवस्थापन समितीला माहिती होते. तरी त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली, असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

दरम्यान, भंडारा सामान्य रुग्णालयात झालेल्या जळीत प्रकरणानंतर रुग्णालय ऑडिट करण्याचा मुद्दा आला होता. आता शाळेची भिंत पडून जखमी झाल्यानंतर शाळा ऑडिट करण्याच्या मुद्दा समोर आला आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.