ETV Bharat / state

संजय राठोड यांनी चालवला 'ट्रॅक्टर', यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण

संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार पी.बी. आडे  यांचे ट्रॅक्टर हे बोधचिन्ह असलेले वाहन चालविल्याने सेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात राठोड हे काम तर करीत नाही ना, अशी चर्चा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सुरू आहे

author img

By

Published : Apr 8, 2019, 1:13 PM IST

संजय राठोड ट्रॅक्टर चालवताना

यवतमाळ - वाशिम मतदारसंघात वाशिमचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे यांचे 'ट्रॅक्टर' हे मतदान चिन्ह आहे. पी. बी. आडे आणि संजय राठोड हे दोघेही बंजारा समाजाचे आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

जय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या संदर्भात संजय राठोड यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी हा व्हिडिओ जुना असून हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी जनता सुज्ञ आहे, असे सांगितले. मी केवळ युतीचाच प्रचार करत असल्याचा दावाही त्यांनी केला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून भावना गवळी उमेदवार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून भावना गवळी आणि संजय राठोड यांचे विळा-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे पी. बी. आडे यांना जाहीर पाठींबा तर त्यांचे बोधचिन्ह असलेल्या ट्रॅक्टर चालवून देत नाहीत, अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहेत.

त्याचबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे यांना भाजपचा छुपा पाठींबा आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार पी.बी. आडे यांचे ट्रॅक्टर हे बोधचिन्ह असलेले वाहन चालविल्याने सेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात राठोड हे काम तर करीत नाही ना, अशी चर्चा यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सुरू आहे.

Intro:संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाणBody:यवतमाळ, : वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकिय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी.बी आडे यांचं 'ट्रॅक्टर' हे मतदान चिन्ह आहे. एकीकडे पी.बी आडे आणि संजय राठोड दोघेही बंजारा समाजाचे आहेत. त्यामुळे बंजारा समाजाच्या व्हॉट्सअप गृपवर हा व्हिडिओ झपाट्याने वायरल होतोय.
या संदर्भात संजय राठोड यांची प्रतिक्रीया घेतली असता कथाकथीत असून हा जुना असुन कोणी कोणी जर हा करत असेल तरी जनता ही सुद्न्य आहे . मी केवळ युतीचाच प्रचार करित असल्याचा दावा त्यांनी केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेकडून भावना गवळी उमेदवार आहेत. मागील दोन-तीन वर्षापासून भावना गवळी आणि संजय राठोड यांचे विळा-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे यांना जाहीर पाठींबा तर त्यांचे बोधचिन्ह असलेल्या ट्रॅक्टर चालवून देत नाहीत अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहेत.त्याचबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी.आडे याना भाजपचा छुपा पाठींबा आहे. त्यामुळे वाशीमचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार यांचे ट्रॅक्टर हे बोधचिन्ह असलेले वाहन चालविन्याने सेनेच्या उमेदवार भावना गवळी यांचे विरोधात सेनेचे संजय राठोड काम तर करीत नाही ना अशी चर्चा यवतमाळ-वाशिम मतदार संघात सुरू आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.