ETV Bharat / state

पोराचा जीव काय असतो हे माय-बापालाच समजते, पालकाची उद्विग्न प्रतिक्रिया - यवतमाळ पोलिओ लसीकरण

चक्क डोळ्यासमोर पोलिओचा डोस ऐवजी सॅनिटायझर पाजून पोरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुठल्याही मायबापासाठी आपल्या पोराचा जीव काय असतो, हे त्यांनाच माहिती असते. पोरगा डोळ्यासमोर उलट्या करत असताना जीव घाबरून गेला होता. पण वेळीच उपचार मिळाल्याने तो बचावला, अशी आपबिती कापशी (कोपरी) गावातील किसन मेश्राम डोळ्यात पाणी आणून सांगत होते.

Sanitizer use as polio vaccine
Sanitizer use as polio vaccine
author img

By

Published : Feb 2, 2021, 7:04 PM IST

Updated : Feb 2, 2021, 7:15 PM IST

यवतमाळ - एक मुलगा तीन वर्षाचा तर दुसरी मुलगी 6 वर्षाची. पोलिओ डोस देण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आल्याने डोस देण्यासाठी बालकांना रविवारी अंगणवाडी केंद्रावर आणले. पण येथे तर चक्क डोळ्यासमोर पोलिओचा डोस ऐवजी सॅनिटायझर पाजून पोरांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुठल्याही मायबापासाठी आपल्या पोराचा जीव काय असतो, हे त्यांनाच माहिती असते. पोरगा डोळ्यासमोर उलट्या करत असताना जीव घाबरून गेला होता. पण वेळीच उपचार मिळाल्याने तो बचावला, अशी आपबिती कापशी (कोपरी) गावातील किसन मेश्राम डोळ्यात पाणी आणून सांगत होते.

बाळाच्या पालकाची संतप्त प्रतिक्रिया
आम्ही अडाणी पण डॉक्टर तर शिक्षित - कापशी (कोपरी) गावातील केंद्रावर तीन कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी होते. हे तिघेही शिक्षित होते. यांनाही पोलिओची लस कुठली आणि सॅनिटायझर कुठले हे लक्षात यायला पाहिजे होते. मात्र, कुठलीच शहानिशा न करता त्यांनी मुलाला सॅनिटायझरचा डोस दिला. दीड तासानंतर मुलाला उलट्या होणे सुरू झाल्याने पायाखालची वाळू सरकली. काय करावे व काय नको हे समजत नव्हते. त्याच्यापेक्षा आम्ही अडाणी बरे, समजले नाही तर दहा लोकांना विचारतो. अशी संतप्त प्रतिक्रिया किसन मेश्राम यांनी व्यक्त केली.

Last Updated : Feb 2, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.