ETV Bharat / state

उत्तरप्रदेशातून एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक; यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - यवतमाळ पोलीस

मो. साकीर मो. जाफर (32), सरफराज उमरखान (33, दोघेही रा. भोजपूर, जि. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील कुख्यात चोरट्यांची नावे आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून सात लाखांची रोकड लंपास केली होती.

yavatmal crime news
उत्तरप्रदेशातून एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक
author img

By

Published : Dec 16, 2019, 10:13 AM IST

Updated : Dec 16, 2019, 10:28 AM IST

यवतमाळ - गॅस कटरने एटीएम मशीन फोडून सात लाख रुपये चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमध्ये ही कारवाई केली. टोळीकडून पाच लाख, स्विफ्ट कार, मोबाईल असा 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उत्तरप्रदेशातून एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक

हेही वाचा - विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांचा पाहणी दौरा; साफसफाई करता कर्मचाऱ्यांची पळापळ

मो. साकीर मो. जाफर (32), सरफराज उमरखान (33, दोघेही रा. भोजपूर, जि. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील कुख्यात चोरट्यांची नावे आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून सात लाखांची रोकड लंपास केली होती. ही घटना 16 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडल्याने खळबळ उडाली होती.

चोरट्यांनी आपली ओळख पटू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरने 20 मिनिटात रोकड पळवली. या प्रकरणी इपीएम चॅनेल मॅनेजर मनोज जाधव (रा. किन्हाळा, ता. कळंब) यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात काहीच कैद न झाल्याने या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी यासाठी चार स्वतंत्र पथक नियुक्त केले. एटीएमची रेकी करण्याची पद्धत लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणे सुरू केले. तपासा दरम्यान चोरट्यांची टोळी उत्तरप्रदेशातील असल्याचे समोर आले. तीन दिवस गाजियाबद येथील भोजपूर येथे तळ ठोकून शुक्रवारी दोन्ही चोरट्यांना अटक केली. स्विफ्ट वाहनाच्या झाडाझडतीत पाच लाखांची रोख रक्कम, गॅस कटर, मोबाईल मिळून आलेत. मो. साकीर व सरफराज खान यांच्याकडून एकूण 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रासह इतरही फोडलेल्या एटीएमचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मुलुंडमध्ये लष्कराचे युद्ध सामग्री प्रदर्शन, जवानांच्या चित्तथरारक कसरती

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Intro:Body:यवतमाळ : गॅस कटरने एटीएम मशीन फोडून सात लाख रुपये चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये ही कारवाई केली. टोळीकडून पाच लाख, स्विफ्ट कार, मोबाईल असा 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मो. साकीर मो. जाफर (32), सरफराज उमरखान (33, दोघेही रा. भोजपूर, जि. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील कुख्यात चोरट्यांची नावे आहेत. पांढरकवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून सात लाखांची रोकड उडविली होती. ही घटना 16 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडल्याने खळबळ उडाली होती. चोरट्यांनी आपली ओळख पटू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारला. गॅस कटरने वीस मिनिटात रोकड पळविली. या प्रकरणी इपीएम चॅनेल मॅनेजर मनोज जाधव (रा. किन्हाळा, ता. कळंब) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात काहीच कैद न झाल्याने या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान होते. पोलिस अधीक्षक एम. राज कुमार यांनी यासाठी चार स्वतंत्र पथक नियुक्त केले. एटीएमची रेकी करण्याची पद्धत लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणे सुरू केले. तपासा दरम्यान चोरट्यांची टोळी उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले. तीन दिवस गाजीयाबद येथील भोजपूर येथे तळ ठोकून शुक्रवारी दोन्ही चोरट्यांना अटक केली. स्विफ्ट वाहनाच्या झाडाझडतीत पाच लाखांची रोख रक्कम, गॅस कटर, मोबाइल मिळून आले. मो. साकीर व सरफराज खान यांच्याकडून एकूण 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रासह इतरही फोडलेल्या एटीएमचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पीएसआय मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बाईट- एम. राज कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक Conclusion:
Last Updated : Dec 16, 2019, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.