यवतमाळ - उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर रेतीमाफियांनी प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेतील आरोपी अद्यापही पोलिसांना पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, मंडळ अधिकारी संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महसूल शाखा अशा संघटनांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
हेही वाचा - पाचव्या सत्रातही घसरण; शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ९.५६ लाख कोटी पाण्यात!
चार दिवस उलटले तरी आरोपींचा पत्ता नाही
उमरखेड येथील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयासमोर 23 जानेवारी रोजी रेती माफिया व कुख्यात गुंड अविनाश चव्हाण यांनी अनधिकृत गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंधक कारवाई करण्यास गेलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी पोलीस विभागामार्फत 26 जानेवारीपर्यंत आरोपीस अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही आरोपीस अटक करण्यात आली नाही. त्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी संपावर गेले आहेत.
सुरक्षेविना करावी लागते कारवाई
शासनाकडून गौण खनिज चोरी प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश देतात. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा आम्हाला मिळत नाही. त्यामुळेच अशा घटना घडतात. रेती घाट हे आज सराईत गुन्हेगारांच्या हाती गेलेले आहेत. त्यामुळे गुंडांकडून रात्रीच्या सुमारास रेतीची अवैध चोरी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी गेले असता अशाप्रकारचे हल्ले होतात. त्यामुके या घटनेतील आरोपीवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (म.को.का)गुन्हे दाखल करण्यात यावे, ही मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.