यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव नगर पंचायतचे तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे स्थानांतरण झाले. परंतु अजूनही मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या नावाचे फलक लावले नाही. त्यामुळे आज स्वतः नगराध्यक्ष यांना नावाचे फलक लिहन्याची वेळ आली आहे.
राळेगाव नगरपंचायत ही नेहमीच वादात राहते. याठिकाणी आजपर्यंत प्रभारी मुख्यधिकारी आहे. त्यामुळे गावातील विकास थांबला आहे. अनेकदा मुख्याधिकारी यांना कक्षाच्या बाहेर नावाचे फलक लावण्यासाठी सांगितले होते. परंतु आजपर्यंत लावले नाही. त्यामुळे आज स्वतः महिला नगराध्यक्ष माला खसाळे यांनी व उपनगराध्यक्ष सुषमा शेलवटे यांनी त्याच्या कक्षाच्या बाहेर नाव लिहून प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध केला.
वाचा - आदिवासी विकास मंत्र्याच्या निवासस्थानासमोर घंटानाद; 'सेव मेरिट, सेव नेशन' आंदोलन