यवतमाळ - नागरिकता संशोधन विधेयक 2019 नुकतेच पारित करण्यात आले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. ते त्वरीत मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी वणी येथे मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच यावेळी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात शहरासह तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधव आणि भगिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. संविधानात प्रत्येक नागरीकाला आपल्या धर्मा नुसार या देशात राहता येते. नागरीक संशोधन विधेयक संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 15 ची पायमल्ली करीत आहे.
हेही वाचा - CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
भारतीय राज्यघटना न्याय, समता आणि बंधुता या मुलभूत तत्वावर आहेत. धर्म, वंश, जात व लींग जन्मस्थान आदीच्या आधारावर भारतीय समाजात भेदभाव करता येणार नाही, असे कलम 15 अन्वये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तर या कायद्याला संपूर्ण देशात विविध ठिकाणी विरोध होत आहे.