यवतमाळ - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. प्रवीण पवार यांनी आज (सोमावरी) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेला २० वर्षात जिल्ह्यात कुठलाही विकास न झाल्याने मी निवडणूक लढवीत आहे.
या मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न औद्योगिक विकास शेतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. हे जनतेला आज दिसून येत आहेत. यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही, त्यामुळेच मी जनतेच्या हितासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी मी ही निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले.